घरठाणेहे तिघाडी सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालतंय - माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

हे तिघाडी सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालतंय – माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण

Subscribe

पालघर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज भाजपकडून विवीध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार होते. मात्र हे मोर्चा आंदोलन कोरोना प्रादुर्भाव म्हणून कारण देऊन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. हे सरकार भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालते, असा आरोप माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केल्यानंतर त्यांनी बोलताना केला. वारंवार भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात तक्रारी दिल्या, पाठपुरावा केला तरी अजून कारवाई केली जात नाही. जिल्ह्यातील नगरपंचायती, नगरपरिषद मधील भ्रष्ट्राचार,कुपोषण समस्या, खावटी योजना वाटप, शेतकरीवर्गाला ५० हजार हेक्टरी नुकसान भरपाई द्यावी, भूकंप बाधित नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, स्थानिकांना नोकरी, आदी विविध मागण्यासाठी आज आंदोलन करण्यात येणार होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांना सादर करताना आमदार निरंजन डावखरे,आमदार संजय केळकर ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, आदी मान्यवरांसह जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, सरचिटणीस संतोष जनाठें उपस्थित होते. हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी कार्यकर्ते, पदाधिकारी यांना पोलिसांनी मनाई आदेश नोटिसा बजावल्या होत्या आणि धरपकड सुरू करून पोलिस ठाण्यात आणले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -