घरठाणेमुंब्य्रातील लसींचा काळाबाजार; केंद्रप्रमुख डॉक्टरावर निलंबनाची कारवाई

मुंब्य्रातील लसींचा काळाबाजार; केंद्रप्रमुख डॉक्टरावर निलंबनाची कारवाई

Subscribe

कौसा येथील लसीकरण केंद्रावर शनिवारी लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र ऑनलाईन नोंदणी करूनही ३०० पेक्षा अधिक नागरिकांना लस न घेता परत जावे लागले होते.

ठाणे महापालिकेच्या कौसा येथील लसीकरण केंद्रातून ४० डोस चोरीला गेले होते. त्या डोसच्या ४ शासकीय व्हाईल्स महापालिकेच्या आरोग्य विभागाने टाकलेल्या धाडीत कौसामधील एका खासगी रुग्णालयात मिळून आल्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाने कौसा लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. शर्मीन धिंगा यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच ज्या खासगी क्लिनिकमध्ये व्हाईल्स सापडल्या त्या क्लिनिकच्या विरोधात ठाणे महापालिकेने मुंब्रा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिल्याची माहिती ठामपाचे उपायुक्त तथा जनसंपर्क अधिकारी मारुती खोडके यांनी दिली.

स्वातंत्र्य दिनी दोन डोस घेतलेल्यांना लोकलमध्ये प्रवेश मिळणार असल्याने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर नागरिकांची अक्षरश: झुंबड उडत आहेत. कौसा येथील लसीकरण केंद्रावर शनिवारी लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र ऑनलाईन नोंदणी करूनही ३०० पेक्षा अधिक नागरिकांना लस न घेता परत जावे लागले होते. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठा गोंधळ झाला होता. ठाणे महापालिकेच्या लसीकरण केंद्रावरील लस या खासगी क्लिनिकला देण्यात येत असल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून केल्यानंतर याची शहानिशा करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने या खासगी क्लिनिकवर धाड टाकल्यानंतर त्या ठिकाणी महापालिकेच्या चार व्हाईल्स आढळून आल्या होत्या.

- Advertisement -

त्यासंदर्भात कंत्राट पद्धतीने घेण्यात आलेल्या आणि कौसा लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. शर्मीन धिंगा यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण न आल्याने पुढील आदेश येईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले असून मुंब्रा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देखील देण्याचे उपायुक्त तसेच जनसंपर्क अधिकारी मारुती खोडके यांनी सांगितले आहे. ठाणे महापालिकेने यासंदर्भात लेखी तक्रार केल्याचे मुंब्रा पोलिसांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

हे ही वाचा- दिल्लीत मोदीविरोधक नाही तर सर्व भ्रष्टाचारी एकत्र येत आहेत; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचे वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -