घर ठाणे भाऊ, भावजयीच्या आत्महत्येचा तपास होत नसल्याने स्वतःचे बोट कापले

भाऊ, भावजयीच्या आत्महत्येचा तपास होत नसल्याने स्वतःचे बोट कापले

Subscribe

उल्हासनगरच्या माजी आमदार दिवंगत ज्योती कलानी यांचे खासगी सचिव असलेले नंदकुमार ननावरे यांनी त्यांची पत्नी उज्ज्वला ननावरे यांच्या सोबत तिसर्‍या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी ननावरे दाम्पत्याने एक व्हिडीओ व्हायरल करून सातार्‍याचे संग्राम निकाळजे यांच्या समवेत अन्य तीन जणांच्या नावाचा उल्लेख केला होता. या प्रकरणाचा तपास पूर्वी विठ्ठलवाडी पोलीस करीत होते. मात्र नंतर हा तपास काढून ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे देण्यात आला. या दुहेरी आत्महत्या प्रकरणात मोदींच्या केंद्रसरकारमधील एक मंत्री पोलिसांच्या तपास कामात हस्तक्षेप करीत असल्याने पोलीस त्या राजकीय पुढर्‍याच्या दबावाखाली आरोपीवर कारवाई करीत नसल्याचा आरोप नंदकुमार ननावरे यांचे बंधू धनंजय ननावरे यांनी केला आहे.

जोपर्यंत भाऊ आणि भावजय यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपींना पोलीस पकडत नाहीत, तोपर्यंत दर आठवड्याला शरीराचे एकेक अंग कापून केंद्रात मोदी सरकारला पाठवणार असल्याचे धनंजय ननावरे यांनी घोषित केले आहे. त्यांनी डाव्या हाताचे एक बोट कोयत्याने कापून मोदी सरकारला पाठवीत असल्याची माहिती व्हायरल व्हिडीओतून दिली आहे. त्यामुळे उल्हासनगर आणि सातार्‍यात एकच खळबळ उडाली आहे. नंदकुमार ननावरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी त्यांना कोणापासून त्रास होत आहे याचा एक व्हिडीओ बनवून पोलिसांना पाठवला होता, असे धनंजय ननावरे यांचे म्हणणे आहे. या व्हिडीओत सातार्‍यातील संग्राम निकाळजेंसमवेत दोन वकिलांचा नावाचा समावेश आहेत. गन्हा दाखल होऊनही वीस दिवस उलटले तरी संबंधितांवर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ धनंजय ननावरे यांनी शरीराचा अवयव कापून केंद्र सरकारला निषेध म्हणून पाठवणार असल्याचे व्हायरल व्हिडीओतून स्पष्ट केले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -