घरठाणेकळव्यात इमारतीचे स्लॅब कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कळव्यात इमारतीचे स्लॅब कोसळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Subscribe

कळवा खारेगाव येथील साई भूषण सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलच्या स्लॅबचे प्लास्टर तर चौथ्या मजल्यावरील दोन रुममधील प्लास्टर पडले तसेच कॉलमला तडे गेल्याची घटना मंगळवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र धोकादायक प्लास्टरचा काढण्यात आला असून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी इमारतीतील रहिवाशांकडून दुरुस्तीचे हमीपत्र घेतले आहे व दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान मुसळधार पावसाआधीच इमारतीचे स्लॅब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साई भूषण सोसायटी ही तळ अधिक ४ मजली असून त्या इमारतीचे बांधकाम २२ वर्ष जुने आहे. त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील हॉलच्या स्लॅबचे प्लास्टर पडले व चौथ्या मजल्यावरील दोन रुमधील प्लास्टर पडले असून कॉलमला ही तडे गेले आहेत. अशी माहिती ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला रात्री मिळताच, घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागासह,कळवा प्रभाग समितीचे बांधकाम विभागाचे अधिकारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली.

- Advertisement -

building slab collapse in thane kalwa

त्यावेळी,दुसरा मजल्यावरील मदन पायनाईक यांच्या मालकीच्या रूम नंबर – २०६ च्या हॉल मधील स्लॅबचे प्लास्टर पडले होते. तर चौथा मजल्यावरील सुधीर चव्हाण यांच्या मालकीच्या रूम नं. ४०२ च्या हॉल मधील प्लास्टर पडले होते व किचन मधील कॉलमला तडे गेले आहेत. तसेच त्या मजल्यावरील सुभाष खांडेकर यांच्या मालकीच्या रूम नं. ४०३ च्या किचन मधील कॉलमला तडे गेल्याचे दिसून आले.

- Advertisement -

यावेळी आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी रुम नं. २०६ मधील उर्वरित धोकादायक प्लास्टरचा भाग काढून टाकला असून इमारतीतील रहिवाशांकडून दुरुस्तीचे हमीपत्र घेतले त्याचबरोबर दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.


दुहेरी हत्याकांडाने निफाड तालुका हादरला !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -