ठाण्यात आजपासून मुंब्रा ते गोल्डन डाईन जंक्शन बससेवा सुरु

ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्यावतीने आज १ जून २०२१ रोजी पासून मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईन जंक्शन (माजिवडा नाका) मार्ग क्रमांक १४२ या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

The only bus air on electricity removed by a faulty battery; Wait for 99 buses
नादुरुस्त बॅटरीने काढली विजेवरील एकमेव बसची हवा; ९९ बसेसच्या प्रतीक्षेत ठामपा

मुंब्रा-कौसा ते माजिवडा या मार्गावर परिवहनची बससेवा सुरू करावी अशी मागणी सातत्याने या मार्गावरील प्रवाशांकडून होत होती. या मार्गावरील प्रवाशांची संख्या लक्षात घेवून त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्यावतीने आज १ जून २०२१ रोजी पासून मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईन जंक्शन (माजिवडा नाका) मार्ग क्रमांक १४२ या मार्गावर बससेवा सुरू करण्यात येणार आहे. तरी प्रवाशांना या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे. मुंब्रा-कौसा, माजिवडा परिसरातील प्रवाशांच्या मागणीनुसार मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईज जंक्शन या मार्गावर प्रायोगिक तत्वावर बससेवा सुरू केली जाणार आहे.

या मार्गावर खालीलप्रमाणे बसफेऱ्या सुरू करण्यात येणार आहे. गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडा नाका) ते मुंब्रा पोलीस स्टेशन मार्ग क्र. 142 वर एकूण 24 बसफे-या असणार आहेत. 06.35, 07.05, 07.35, 08.05, 08.35, 09.05,10.05,10.35,11.15, 11.45, 12.25, 12.55, 14.00, 14.30, 15.00, 15.30, 16.00, 16.30, 17.40, 18.10, 18.50, 19.20, 20.00, 20.30 या वेळेत या बसफे-या धावतील. तर मुंब्रा पोलीस स्टेशन ते गोल्डन डाईज जंक्शन (माजिवडा नाका) मार्ग क्र. 142 वर एकूण 24 फेऱ्या असणार आहेत. 07.05, 07.35, 08.05, 08.35, 09.05, 09.35, 10.40, 11.10, 11.50, 12.20, 13.00, 1330, 14.30, 15.00, 15.30, 16.00,16.35, 17.05, 18.15, 18.45, 19.25, 19.55, 20.35, 21.05 या वेळेत धावणार असून प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.