घरठाणेबांधकाम परवानगीसाठी व्यावसायिकांनी वापरला पालिकेचा खोटा शिक्का, एसआयटीकडून चौकशी सुरू

बांधकाम परवानगीसाठी व्यावसायिकांनी वापरला पालिकेचा खोटा शिक्का, एसआयटीकडून चौकशी सुरू

Subscribe

कल्याण – रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्याकरता खोट्या सही व बनावट शिक्यांचा वापर केल्याप्रकरणी ६५ बांधकाम व्यावसायिकांविरोधात एसआयटीने तपास सुरू केला आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली पालिकेतील अनेक अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – चेन स्नॅचिंग बहाद्दर, ९० पेक्षा जास्त गुन्हे; कर्नाटकच्या चोराला भिवंडीत अटक

- Advertisement -

रेरा प्राधिकरणाकडून नोंदणी प्रमाणपत्र घेण्याकरता पालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घेणे आवश्यक असते. याकरता कल्याण-डोंबिवलीतील जवळपास ६५ बांधकाम व्यावसायिकांनी नगररचना विभागाचा शिक्का आणि अधिकाऱ्याची खोटी सही करून बांधकाम परवानगी घेतली. यानुसार त्यांना नोंदणी प्रमाणपत्र मिळाले. मात्र, ही घटना उजेडात येताच याविरोधता पोलीस तक्रार करण्यात आली. त्यामुळे या घटनेची गांभीर्य लक्षात घेत या घटनेचा तपास आता एसआयटीमार्फत करण्यात येत आहे. या तपासकार्यात माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी बनावट शिक्का आणि सहीप्रकरणी चौकशी अहवाल एसआयटी आणि ईडी या तपास यंत्रणांना सादर केले आहेत. यामुळे आता पालिकेचे संबंधित अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे.

वास्तुविशारद संदीप पाटील यांच्या पाठपुराव्यांमुळे डोंबिवलीत एकूण ६५ बांधकाम व्यवसायिकांविरोधात रामनगर व मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये खोट्या कागदपत्रांच्या आधारित फसवणूक केल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा  पर्दाफाश झाला आहे. पाच बांधकाम व्यवसायिकांच्या आत्तापर्यंत मुसक्या आवळण्यात आल्या असून एसआयटीचे पथक उर्वरित साठ बांधकाम व्यवसायिकांच्या शोधात असून सर्व भूमिगत झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगीचे कागदपत्रे तयार करून ६७ प्रकरणांची नगररचना विभागाकडून पडताळणी केली असता बांधकाम परवानगी दिली गेली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – फेसबुकवरील जाहिरातीला भुलली महिला अन् लागला १२ लाखांना चुना

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा पाढा घाणेकर यांनी निवेदनात नमूद केला आहे. गैरकृत्यांबाबत ठपका व दोषी ठरवूनही पालिका प्रशासन व राज्य शासनाने अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई केली नसल्याने या एसआयटी व ईडीकडे याबाबत कागदपत्रांच्या चौकशीचा पुराव्यासह दिलेल्या निवेदनात जोडल्याने चौकशीची ससेमिरा पाठीमागे लागल्यास अनेक अधिकारी गोत्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -