घरठाणेठाण्यात भाजपच्या १७ नगरसेवकांवर गुन्हा दाखल

ठाण्यात भाजपच्या १७ नगरसेवकांवर गुन्हा दाखल

Subscribe

भाजपने दिलेल्या तक्रारीनुसार शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा प्रकार ताजा असतानाच, शुक्रवारी कोरोना कालावधीत म्हणजे नोव्हेंबर महिन्यात ऑनलाईन महासभेच्या वेळेस सभागृहाबाहेर गर्दी करून ऑफलाईन सभा घ्यावी म्हणून हातात फलक घेऊन घोषणाबाजी करणार्‍या भाजपच्या तब्बल १७ नगरसेवकांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपने शिवसेनेच्या नगरसेवकांसह ४० पदाधिकार्‍यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात १८८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता भाजपच्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दिव्यात राहणारे सूर्यकांत पौळ हे महाराष्ट्र सुरक्षा बलाअंतर्गत सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून ठाणे महापालिकेत कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीत, २० ऑक्टोबर रोजी झालेल्या ऑनलाईन महासभेच्या वेळेस ही महासभा ऑफलाईन घ्यावी या मागणीसाठी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहाबाहेर एकत्र येऊन हातात फलक घेऊन घोषणाबाजी करून आंदोलन केले होते. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महासभेत देखील अशाच पध्दतीने त्यांनी थेट कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात आंदोलन केले होते. असे या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

- Advertisement -

मागील नोव्हेंबर महिन्यात देखील कोरोनाची परिस्थिती असल्याने गर्दी करू नये, जमाव करू नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. असे असताना देखील या नगरसेवकांनी त्याचे उल्लंघन केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे, संदीप लेले, सुनेश जोशी, कृष्णा पाटील, अर्चना मनेरा, मिलिंद पाटणकर, संजय वाघुले, मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, नंदा पाटील, आशा शेरबहादुर सिंग, नारायण पवार, स्नेहा आंब्रे, दीपा गावंड आणि अशोक राऊळ यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (३), १३५ प्रमाणे तसेच कलम १८८ भादंवि प्रमाणे तसेच साथीचे रोग अधिनियम सन १८९७ चे कलम व ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -