घरठाणेनैसर्गिक रंग वापरून पर्यावरणपूरक 'होळी उत्सव' साजरा करा

नैसर्गिक रंग वापरून पर्यावरणपूरक ‘होळी उत्सव’ साजरा करा

Subscribe

'होळी सण' साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

ठाणेकर नागरिकांनी होळीच्या सणाला वृक्षतोड, पाण्याच्या होणार अपव्यय आणि रासायनिक रंग या सर्व गोष्टी टाळत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा ‘होळी उत्सव’ कोव्हिड-१९ प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून अत्यंत साधा पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
दिवसेंदिवस पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेवून नागरिकांनी वृक्षतोड टाळावी तसेच धुलीवंदनाच्या दिवशी मोठया प्रमाणावर रंगाचा वापर करण्यात येतो त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. त्याचबरोबर बेसावधपणे रंगाचे फुगे डोळ्यावर पडल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून होळीसाठी नैसर्गिक रंगाचा वापर करून कोव्हिड-१९ प्रतिबंधक मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करत अत्यंत साधा पद्धतीने ‘होळी उत्सव’  साजरा करण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -