घरठाणेआम्ही अशाच ठिकाणी जातो; जिथे कॅमेरा घेऊन जाऊ शकतो, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना...

आम्ही अशाच ठिकाणी जातो; जिथे कॅमेरा घेऊन जाऊ शकतो, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोला

Subscribe

ठाणे – मुख्यमंत्री राज्यकारभार सोडून गणपती दौऱ्यात व्यग्र असल्याची टीका विरोधकांनी आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्यूत्तर दिले आहे. लोकांना मी आपला मुख्यमंत्री वाटतो त्यामुळेते माझ्याजवळ येऊन फोटो काढतात. पण इतरांबाबत तसे का घडत नाही, याचे उत्तर मला ठाऊक नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ठाण्यातील नवरात्रौत्सव मंडळाच्या मंडप पुजेवेळी त्यांनी अजित पवारांवर टीका केली.

मी फिरायला लागल्यामुळे अनेक लोक फिरायला लागले आहेत. त्यांना मिळणारे पुण्य हे मी फिरल्यामुळे मिळत आहे. त्यामुळे त्यांनी ते पुण्य आनंदाने घ्यावे. ही आपली संस्कृती आणि परंपरा आहे. काही लोक म्हणतात, मी कॅमेरे घेऊन जातो. पण माझ्याकडे कॅमेरा नसतो, लोक माझ्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करतात. मी प्रत्येक ठिकाणी जातो. तेथील लोकांना असं वाटत की, हा आपला मुख्यमंत्री आहे. त्यामुळे त्या भावनेने फोटो काढायला येतात. लोकांना ज्याच्या जवळ जावसं वाटत त्याच्याकडेचं फोटो काढायला येतात. आता बाकी लोकांच्याजवळ ते का जात नाहीत, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. आम्ही अशाच ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी कॅमेरा घेऊन जाऊ शकतो, असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना लगावला.

- Advertisement -

शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला –

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज असल्याची टीका त्यांनी केली होती. एक मुख्यमंत्री राज्याचा कारभार पाहण्यासाठी आणि एक मुख्यमंत्री फिरण्यासाठी हवा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते. याशिवाय, अन्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले होते. या सगळ्या आरोपांना एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. फोटो काढायला लोकांच्या जवळ जायला लागते. लोक मला आपुलकीने बोलवत असतात त्यामुळे त्यांना नाकारता येत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -