घरठाणेभिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Subscribe

मुंबई | भिवंडी (Bhiwandi) येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील (Bhiwandi Building Accident) मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून (Chief Minister’s Relief Fund) देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार पाडावे. तसेच जखमींना तत्काळ रुग्णालयांमध्ये हलवून उपचार सुरू करावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ठाण्यातील भिवंडीच्या वलपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळल्याची मोठी घटना घडली आहे. या दुर्घटनेत ४० ते ५० रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळाली असता त्वरीत भिवंडी अग्निशामक दल, जवान, पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु समोर आलेल्या माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली, ४०-५० रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

- Advertisement -

या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने खबरदारी म्हणून ठाण्यातून सात ते आठ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. तसेच भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात ढिगाऱ्याखालून काढण्यात येणाऱ्या नागरिकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष करण्याचे आदेश देताना, जिल्हा रुग्णालयातही एक कक्ष तयार ठेवण्याच्या सूचना ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिल्या आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -