Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे भिवंडीत विजेचा धक्का लागून बालमजुराचा मृत्यू

भिवंडीत विजेचा धक्का लागून बालमजुराचा मृत्यू

कंत्राटदारा विरुद्ध गुन्हा दाखल करून केली अटक

Related Story

- Advertisement -

भिवंडीतील कोनगाव येथे लोंबकळत्या झुल्यात बसून इमारतीच्या भिंतीवरील भेगा बुजवत असताना,  बाजूने गेलेल्या उच्च दाबाच्या विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन  १३ वर्षाच्या बालमजुराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  घडली आहे. याप्रकरणी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवम उर्फ मोनू मौर्य (१३) असे या दुर्देवी बालमजुराचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील मधुबनी येथे राहणारा शिवम हा काही महिन्यापूर्वी मुंबईत आला होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्याला कुटुंबियांनी मुंबईत कामधंदा करण्यासाठी पाठवले होते. शिवम हा सध्या भिवंडीतील कोनगाव येथे राहत होता. भूपेंद्र कुशवाह (३४) या कंत्राटदाराकडे शिवम हा मोलमजुरी करीत होता. भूपेंद्र कुशवाह हा छोटेमोठे बांधकामाचे कंत्राट घेत होता शिवमी हा त्याच्याकडे मजूर म्हणून काम करीत होता.

कल्याण भिवंडी रोडलगत असणाऱ्या शांती अपार्टमेंट या इमातीला पडलेल्या भेगा बुजवण्याचे काम भूपेंद्र याला मिळाले होते. मंगळवारी भूपेंद्रने शिवमला लोंबकळत्या झुल्यावर चढून इमारतीच्या भेगा बुजवण्यासाठी सांगितले. शिवम हा झुल्यावर चढून भेगामध्ये सिमेंट भरीत असताना झुला  इमारतीच्या बाजूने गेलेली उच्च दाबाच्या विजेच्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे शिवमला विजेचा शॉक लागून शिवम हा झुल्यासह दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याघटनेची माहिती मिळताच कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंत्राटदार भूपेंद्र कुशवाह याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

- Advertisement -