घरठाणेभिवंडीतील नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करावे

भिवंडीतील नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करावे

Subscribe

आयुक्त डॉ.पंकज आशिया यांचे आवाहन

भिवंडी शहर परिसरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, भिवंडी शहरात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेकामी महापालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी तातडीने भिवंडी पोलीस विभाग व पालिका अधिकारी यांची विशेष बैठक बोलावून भिवंडीतील नागरिकांनी कोरोना त्रिसूत्री नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.

या बैठकीस भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, पालिका अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, वैद्यकीय अधिकारी डॉ.कारभारी खरात, जागतिक आरोग्य संघटनेचे भिवंडी प्रतिनिधी डॉ.किशोर चव्हाण, सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, सर्व प्रभाग अधिकारी उपस्थित होते. शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना शहरात सुरू करण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, या कामी पालिका व पोलीस विभाग यांचे सयुंकत पथक काम करेल. हे पथक मास्क न वापरणारे यांच्या विरोधात कारवाई करेल. अशा व्यक्तींकडून 200 रुपये दंड वसूल करेल. तसेच पालिका कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या मंगल कार्यालयांमध्ये लग्नसमारंभासाठी महानगरपालिका व पोलीस यांची परवानगी देण्यात आली आहे किंवा नाही याची देखील तपासणी हे.पथक करणार आहे.

- Advertisement -

रीतसर परवानगी नसल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई देखील करण्यात येणार आहे, महापालिका क्षेत्रात रस्त्यावर बसणाऱ्या फेरीवाले यांच्याकडून योग्य ते सामासिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) चे पालन करीत नसेल तर अशा फेरीवाल्यांवर दोनशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई, मार्केट परिसर असलेल्या सर्व दुकानदार दुकानाचे मालक या नियमाचे पालन करत नसतील तर अशा दुकानांवर पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सर्व मोठ्या आस्थापना जसे मंगल कार्यालय, हॉल जिमखाना हॉटेल, रेस्टॉरंट, चित्रपट गृह, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, क्रीडांगणे, भाजी मार्केट परिसर, राजकीय पक्ष मेळावे, खाजगी शिकवणी वर्ग, तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणे अशा सर्व ठिकाणी मास्कचा वापर, सामासिक अंतर, याचे पालन होत नसेल तर अशा आस्थापनांवर रुपये पाच हजार प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात येणाऱ्या शेअरिंग द्वारे रिक्षा, प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.

अशा वेळी एका रिक्षा यामध्ये रिक्षाचालक व्यतिरिक्त दोन पेक्षा जास्त प्रवास करत असल्यास संबंधित रिक्षाचालकाकडून पाचशे रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस गाड्या या नियमांचे पालन करणार नसेल तर त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. कोरोनाला रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी पालिका व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त डॉक्टर पंकज आशिया, पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी संयुक्तपणे केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -