स्वच्छता सर्वेक्षणात ठाणे शहर देशात चौदावे, तर राज्यात तिसऱ्या स्थानी

clean survey thane again ranks 14th country and 3rd state
स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे देशात चौदावे, तर राज्यात तिसरे

भारत सरकारच्यावतीने सन २०२१ मध्ये केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठाणे शहराने देशात चौदाव्या क्रमांकवर तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीचा क्रमांक राखण्यात शहराला यश आले आहे.

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. २०२१ रोजी कचऱ्याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आणि निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते.

या सर्वेक्षणामध्ये २०२० ला ठाणे शहराने ५७ व्या क्रमांकावरून देशात १४ व्या क्रमांकावर आघाडी घेतली होती. तर २०२१ ला हाच क्रमांक राखण्यात यश आले आहे, तर राज्यात ठाणे शहराने तिसरा क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घनकचरा व्यवस्थापन टीमचे अभिनंदन केले आहे.

कचरामुक्त शहराचे ठाणे शहराला ‘थ्री स्टार’ मानांकन

कचरामुक्त शहर आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या देशभरातील महापालिकांंना दिल्या जाणाऱ्या मानांकनामध्ये ठाणे महापालिकेला ‘थ्री स्टार’ नामांकन जाहीर झाले आहे. या निमित्ताने आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने कचरा व्यवस्थापनात केलेल्या कार्यावर सन्मानाची मोहर उमटली आहे. शनिवारी केंद्रीय नगरविकास आणि शहर कामकाज विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांच्या हस्ते हा सन्मान ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांनी नवी दिल्ली येथे स्विकारला.

ठाणे शहरातील सोसायट्यांमध्ये कचऱ्याबाबत जनजागृती, ओला कचरा सुका कचरा.वर्गीकरण, कचरा वेचकांची नियुक्ती, ई वेस्टचे योग्य नियोजन, निर्माल्य पासून खत निर्मिती, हिरव्या कचऱ्यापासून ब्रिकेट तयार करणे, कचरा कुंडी मुक्त शहर आदी पर्यावरण पुरक योजनांमुळे ठाणे महापालिका थ्री स्टार मानांकनापर्यंत पोहचली आहे. भारत सरकारने देशभरातील महापालिकांंचचे विविध निकषांवर सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये ठाणे महापालिकेने बाजी मारली आहे. घनकचरा व्यवस्थापन बाबत ठाणे महापालिका करीत असल्याने विविध उपाययोजनांमुळे ठाणे महापालिका हे सर्व निकष पुर्ण केले आहेत.