घरठाणेठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

Subscribe

कोचीन मध्ये केलं महाराष्ट्राच प्रतिनिधीत्व

ठाण्यात राहणाऱ्या आणि वेदांत रुग्णालयात आय सर्जन असलेल्या डॉ. रजनी म्हशीलकर यांनी वेळेचा सदुपयोग करून आपला छंद जोपासला. त्यामुळे “असेल आवड तर होईल सवड” या म्हणीला सार्थ ठरणारी किमया साधली. नेहमीच व्यस्त असलेल्या मात्र कोविड मध्ये उसंत मिळालेल्या फावल्या वेळेत डॉ. रजनी मशिलकर यांनी कोचीनच्या स्पर्धेत भाग घेतला. त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आणि विजयाच्या मानकरी ठरल्या. ऑडिशन, सेमी फायनल, फायनल असा प्रवास यशस्वी करून पहील्या ६ मध्ये मध्ये प्रवेश केला. मिसेस इंडिया ग्लोबल कॉन्टेस्ट ३० मार्च रोजी झाल्या यात डॉ. रजनी मशिलकर यांनी ऑपेरा मिसेस इंडिया २०२१, मिसेस इंडिया ग्लोबल वेस्ट २०२१ आणि मिसेस विव्हर चॉईस २०२१ या तीन पारितोषिकाच्या मानकरी ठरल्या. डॉ. रजनी म्हशीलकर यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मी कोविड मध्ये मिळालेल्या वेळेचा फायदा घेतला. मला मॉडेलिंगच्या छंद होता. तो पुरा करण्याची संधी मिळाली. मात्र आय सर्जन हे माझे प्रोफेशन आहे. यामध्ये खूप मान, सन्मान आहे. स्पर्धेसाठी गेल्यानंतर मस्कारा, लेन्समुळे डोळ्याला झालेल्या इजा यावर मी उपचार केले. आय सर्जन असल्याचा मला खूप फायदा झाला. तसेच डोळे दान करणार आहे. अन लोकांनीही डोळे दान करावे म्हणून जागृती करणार आहे. जगात अनेक लोक अंध आहेत. कॉर्निया मिळत नसल्याने आणि ते खराब झाल्याने उपयोगात येत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया होत नाही. अन एक अंध जेव्हा बघू लागेल तेव्हा जो आनंद मिळतो त्याची किंमत कशातही मोजता येत नाही. अशी प्रतिक्रिया डॉ. रजनी म्हशीलकर यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -