छप्परापर्यंत काम झालेली घरे आठ दिवसात पूर्ण करा- मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल

union budget 2023 fm nirmala sitharaman announces increase in pmay pradhan mantri awas yojana

कल्याण येथे तालुकास्तरीय अमृत महाआवास अभिमान अंतर्गत अपूर्ण असलेल्या घरकुल सर्व लाभार्थ्यांना अपूर्ण असलेली घरे तातडीने पूर्ण करावी, तसेच छप्परापर्यंत काम झालेली घरे येत्या आठ दिवसात पूर्ण करा अशा सूचना ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिल्या.
कल्याण येथे तालुकास्तरीय अमृत महाआवास अभिमान अंतर्गत अपूर्ण असलेल्या घरकुल लाभार्थ्यांची कार्यशाळा मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल व प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली
घेण्यात आली. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती कल्याण तर्फे आदित्य अँग्रो फार्म, ग्राम पंचायत रायते, कल्याण येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते या ऑनलाईन झूम लिंकद्वारे कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी संवाद साधून लाभार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी इतर राज्यात नियोजित वेळेपूर्वी घरकुले पूर्ण होतात. बिहार, झारखंड सारख्या राज्यात कमी वेळेत घरकुले पूर्ण होतात, मग आपली घरकुले ही योग्य नियोजन करून व त्यानुसार कार्यवाही केली तर नक्कीच ठरवलेल्या वेळेत पुर्ण होतील. घरकुल पूर्ण करावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

तर प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी अमृत महाआवास अभियान बाबत लाभार्थ्यांना माहिती दिली. अभियानाच्या या तिसर्‍या वर्षात देखील राज्यात आघाडीवर राहण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले व सुरू नसलेली घरकुल कामे तातडीने सुरू करुन अपूर्ण घरकुले येत्या 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करण्याबाबत त्यांनी सुचना दिल्या.
तर कल्याण पंचायत समिती गट विकास अधिकारी अशोक भवारी यांनी सर्व लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व घरकुले पूर्ण करण्याबाबत लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच घरकुल बांधून झाल्यानंतर देखील इतर योजनांचा लाभ अभिसरणाद्वारे लाभार्थी कसा घेऊ शकतो याची माहिती दिली. आदर्श घरकुल करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सर्व पूरक योजनांची माहिती तसेच पंचायत समिती अंतर्गत राबविल्या जाणार्‍या योजनांची माहिती देण्यात आली. घोलप वि.अ. (कृषी) यांनी शेती विषयक योजनांची माहिती लाभार्थ्यांना दिली. संत, वि.अ. (कृषी) यांनी सुरु नसलेल्या घरकुल लाभार्थी यादीचे वाचन केले. प्रत्येक लाभार्थ्यांशी संवाद साधून घरकुल कामे तातडीने सुरु करावीत असे सांगितले. या कार्यशाळेमध्ये लाभार्थ्यांनी सुध्दा आपल्या अडचणी मांडल्या. त्यावरील उपाय योजना झाल्यामुळे घरकुल काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करु असे आश्वासित केले.