घरठाणेकल्याण - टिटवाळा मेट्रोने जोडा...!

कल्याण – टिटवाळा मेट्रोने जोडा…!

Subscribe

हजारो गणेश भक्तांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रासह देश विदेशातील लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महागणपती क्षेत्र टिटवाळ्याला कल्याण मेट्रो ने जोडण्यात यावे आग्रही मागणी हजारो गणेश भक्तांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
टिटवाळा येथे पेशवेकालीन ऐतिहासिक महागणपती तीर्थक्षेत्र आहे. दररोज हजारो गणेश भक्त टिटवाळा येथे महागणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेवर या गर्दीचा अतिरिक्त भार पडत असतो. टिटवाळा आहे तीर्थक्षेत्राप्रमाणेच कल्याण डोंबिवली महापालिका तसेच एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळे वाढत्या शहरीकरणामुळे उपनगरीय रेल्वे सेवेवर याचा मोठा ताण पडत आहे.

रस्ते वाहतुकीने टिटवाळा गणपती दर्शनासाठी यायचे तर गणेश भाविकांना कल्याण मुरबाड हायवे मार्गे एक तासाचा मोठा वळसा घालून टिटवाळा गाठावे लागते. तसेच येथील शहरीकरणाचा वाढता विस्तार लक्षात घेता कल्याण डोंबिवली पर्यंत आलेले मेट्रो सेवेचे जाळे टिटवाळ्यापर्यंत विस्तारल्यास लाखो गणेश भक्तांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिराप्रमाणेच श्री महागणपती क्षेत्र टिटवाळा हे ठाणे जिल्ह्यातील आणि एमएमआरडीए क्षेत्रातील एक मोठे पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पर्यंत आणलेली मेट्रो टिटवाळा गणपती मंदिरापर्यंत विस्तारित करावी अशी आग्रही मागणी हजारो गणेश भक्त करत आहेत.
चौकट
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे टिटवाळ्यावर लक्ष..!
कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे कल्याण डोंबिवली बरोबरच टिटवाळा येथील विकास कामांवर ही बारीक लक्ष असते. डोंबिवली कल्याण दुर्गाडी किल्ला मार्गे टिटवाळा हा महत्त्वकांक्षी रिंग रोड प्रकल्प खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच शेवटच्या टप्प्यापर्यंत आला आहे. त्यामुळेच कल्याणची मेट्रो टिटवाळा गणपती मंदिरापर्यंत विस्तारित करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न करावेत अशी देखील भावना गणेश भक्त व्यक्त करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -