घरठाणेबदललेल्या स्थितीतही जे बदलत नाहीत तेच खरे मित्र

बदललेल्या स्थितीतही जे बदलत नाहीत तेच खरे मित्र

Subscribe

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे उद्गार

यापूर्वी संघ प्रसिध्द नव्हता, परंतु आता काळ आणि देशातील स्थितीही बदलली आहे. स्थिती बदलल्यावरही जे बदलत नाहीत, तेच खरे मित्र, असे उद्गार सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. चांगल्या परिस्थितीत येणारे आणि वाईट परिस्थितीत जाणारे असेही मित्र असतात. मात्र, परिस्थिती कधीही कायम नसते, असेही भागवत म्हणाले. डॉ. मोहन भागवत शुक्रवारी ठाण्यात आले होते, त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले. यावेळी भागवत यांनी राज्याधिकार, अर्थाधिकार हे जितके सामान्य माणसाच्या हाती जातील तितके चांगले होईल, असेही स्पष्ट केले. शेवटी सत्याचाच जय होतो, हे देखील तितकेच सत्य असल्याचे ते म्हणाले.

टीजेएसबी सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समांरभासाठी भागवत हे ठाण्यात आले होते. यानिमित्त ठाण्यातील एका हॉटेलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, उपाध्यक्ष शरद गांगल आणि व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे हे उपस्थित होते.

- Advertisement -

याप्रसंगी बोलताना भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक सहकार क्षेत्रात का आले, बँकिंग या विषयाकडे व्यवसाय म्हणून त्यांनी पाहिले नाही, असे सांगितले. देशात सहकार हा खूप प्राचीन आणि जुना आहे, सहकार ही गोष्ट भारतीयांच्या रक्तात आहे. तयार झालेली शक्ती केंद्रित झाल्यास त्याचा चांगला उपयोग होतो. तसेच त्याचा वाईटही उपयोग होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अर्थ ही एक शक्ती असून तिच्यामध्ये माणसाला भटकवण्याचे सामर्थ्य आहे. त्याचबरोबर दिशा बदलविण्याचे सामर्थ्य आहे, त्यामुळे चांगले वाईट समजायला हवे. पैसा हा समाज चालवण्यासाठी मिळवायचा असतो, आपण लक्ष्मीपूजन करणारे आहोत, त्याचा पाया धर्म आहे. विना सहकार नाही उद्धार, यासोबतच संघ स्वयंसेवकांनी त्यात आणखी एक वाक्य जोडले, विना संस्कार नाही सहकार, असे ते वाक्य आहे. सहकाराबरोबच संस्कार असायला हवेत, असेही भागवत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -