घरठाणेCorona : वृद्ध शिक्षिकेला ड्युटीची सक्ती, संसर्ग झाल्याने मृत्यू; मुख्याध्यापकांच्या चौकशीचे आदेश

Corona : वृद्ध शिक्षिकेला ड्युटीची सक्ती, संसर्ग झाल्याने मृत्यू; मुख्याध्यापकांच्या चौकशीचे आदेश

Subscribe

कोरोनामुळे शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची सवलत देण्यात आलेली असतानाही ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी वृद्ध शिक्षिकेला ड्युटीची सक्ती केल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. कोविडची लागण होऊन या शिक्षिकेचा मृत्यू झाला असून प्रशासनाने या प्रकरणी मुख्याध्यापकांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून मात्र अजून पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही, अशी माहिती मिळत आहे.

कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षक मागील जुलै महिन्यापासून नियमित ऑनलाईन वर्ग घेत आहेत. मात्र ठाणे येथील शिवसमर्थ विदयालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करत आहेत. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, बदलापूर, नवी मुंबई तसेच इतर उपनगरात रहाणारे शिक्षक ऑगस्ट महिन्यांपासून बस व खाजगी वाहनाने प्रवास करुन शाळेत जात होते. त्यामुळे याच शाळेतील ५६ वर्षीय अलका सुर्यवंशी यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांना डायबेटीसचा त्रास असल्याची माहिती देखील मुख्याध्यापकांना दिली होती. मात्र तरी देखील शाळेत उपस्थित राहण्याचा तगदा लावण्यात येत होता. तसेच शाळेत उपस्थित न राहिल्यास रजा लावण्यात येत असून वेतन कपात देखील करण्यात येत होती. त्यामुळे त्या पुन्हा शाळेत येवू लागल्या आणि पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात त्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मृत शिक्षिकेचे पती अनिल सूर्यवंशी यांनी केला आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल करा

या प्रकरणी शालेय संस्थेची नोंदणी रद्द करण्याची मागणी अनिल सूर्यवशी यांनी केली असून नौपाडा पोलीस ठाण्यात मुख्यध्यापक घोडके यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा –

दिलासा! देशात गेल्या २४ तासांत ५७ हजार ३८६ रुग्णांची कोरोनावर मात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -