घरठाणेठामपा रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव

ठामपा रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव

Subscribe

 कळवा रुग्णालयात ३८ तर इतर आरोग्य केंद्रात ४६ जण बाधित

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील ८ निवासी डॉक्टरांसह एकूण ३८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब पुढे येत नाही तोच महापालिका अंर्तगत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही आता ४६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशाप्रकारे महापालिकेच्या आरोग्य यंत्रनेमध्येही  कोरोनाचा शिरकाव झाल्याचे दिसत आहे. ज्यांना लक्षणे आढळून आले आहेत, त्यांना महापालिका पार्किंग प्लाझा येथील रुग्णालयात तर ज्यांना लक्षणे नाही अशांना भाईंदर पाडा येथील विलीगिकरणात उपचारार्थ दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच ठामपाच्या कळवा रुग्णालयात डॉक्टरांसह मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी ही कोरोना पॉझिटिव्ह येण्यास सुरुवात झाली आहे. कळवा रुग्णालयातील ८ निवासी डॉक्टरांसह ९ पदवीपूर्व विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ५ मुले आणि ४ मुलींचा समावेश आहे.

- Advertisement -

याशिवाय येथील पॅरामेडीकल अर्था विविध विभागातील टेक्नीशिअन स्टाफला देखील कोरोनाची लागण झाली असून यातील ९ जण कोरोना बाधीत आढळले आहेत. ८ परिचारिका ५ इतर आणि एक बालरोग तज्ञ डॉक्टर (प्रोफेसर) यांच्यासह ३८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही ४६ जणांना कोरोना बाधा झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मीनाताई ठाकरे, कोपरी,शीळ,सावरकर नगर, कौसा,माजीवडा, वाडिया, वर्तकनगर, उथळसर, हजुरी, आझाद नगर,खारेगाव,आतकोनेश्वर किसननगर, मुंब्रा,रुग्णवाहिका विभागाचा समावेश आहे. याठिकाणाचे १० वैद्यकीय अधिकारी, १४ परिचारिका, २० वॉर्डबॉय आणि मावश्या तसेच औषध निर्माता व प्रयोग शाळेतील कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

सिव्हिलमध्ये एक डॉक्टर पॉझिटिव्ह
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात ही एक डॉक्टर पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यांना काही प्रमाणात लक्षणे होती. त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना लवकरच घरी सोडण्यात येईल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -