घरठाणेआधारवाडी जेलमध्ये ३५ कैद्यांसह ५ कर्मचारी कोरोनाबाधित

आधारवाडी जेलमध्ये ३५ कैद्यांसह ५ कर्मचारी कोरोनाबाधित

Subscribe

तुरुंग अधीक्षकांची माहिती

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेलमध्ये ३५ कैद्यांसह ५ कर्मचारी, अधिकारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. आधारवाडी जेलमध्ये सध्या पंधराशेच्यावर  कैदी असल्याचे जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी सांगितले.
या  कोरोना बाधित कैद्यांची तब्येत स्थिर असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी  आधारवाडी जेलमधील कैद्यांची कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४० जणांचा  अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यापैकी ३५ कैद्यांना  रुग्णालयात पाठवण्यात आले असून कारागृहातील सर्वच  कैद्यांचे कोवीड लसीकरण पूर्ण झाले  आहे. तर सोमवारपासून बूस्टर डोस देण्याचे सुरु असतानाच हा प्रकार समोर आला. कोरोना रुग्ण सापडल्यानंतर जेलमध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. तसेच एखाद्या कैद्याला   थंडी ताप आल्यास जेलमध्ये विलगीकरण कक्षही बनविण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बाॅस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्याबाबत जिल्हा अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. उर्वरित सर्व कैद्यांना पोषक आहार देण्यात येत असल्याची माहिती जेल अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -