घरठाणेपहिल्या दोन लाटेत ३४ हजारांहून अधिक बालके कोरोनाग्रस्त

पहिल्या दोन लाटेत ३४ हजारांहून अधिक बालके कोरोनाग्रस्त

Subscribe

२० जणांचा जिल्ह्यात मृत्यू

कोरोना या आजाराची लक्षणे ही वयोवृद्ध किंवा मध्यम आणि तरुण या वयोगटातच दिसून आली नाहीतर ती लक्षणे ०-१५ या वयोगटातही (लहान मुलांमध्ये) प्रामुख्याने समोर आली आहेत. जिल्ह्यात ०-१५ या वयोगटातील आतापर्यंत ३४ हजार ७८० बालकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आजाराने जिल्ह्यात २० बालकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यातच तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात असून त्यामध्ये या लाटेत ४ ते १४ या वयोगटाला संभाव्य धोका वर्तविण्यात आला आहे. त्यादृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे जिल्ह्यात मार्च २०२० पासून ते आतापर्यंत ५ लाख १८ हजार ४९० जण कोरोनाग्रस्त झाले आहेत. त्यातच, ५ लाख ६ हजार ६१३ जणांनी या आजारावर मात करून घरी परतले आहेत. मात्र, ९ हजार ४०९ जणांचा या आजाराने मृत्यू झाला. तर ७ हजार ५६८ रुग्ण हे सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णात उपचार घेत आहेत. फेब्रुवारी अखेरीस असलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रुग्ण संख्या प्रचंड वाढली होती.यावेळी बेड्स मिळविण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागली होती.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे वाढलेल्या रुग्णसंख्येला आळा घालण्यात यश आले. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्ण संख्या ५०० ते ७०० च्या घरात आहे. दरम्यान तिसर्‍या लाटेच्या शक्यता वर्तवली जात असल्याने ठाणे महानगरपालिकेने लहान मुलांची विशेष काळजी घेण्यासाठी पार्किंग प्लाझा, कोविड सेंटर येथे एक कक्ष उभारला आहे. याठिकाणी १०० बेडची व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये ५० ऑक्सिजनचे, २५ आयसीयु आणि २५ आयसीयु व्हेन्टीलेटरच्या बेडचा समावेश आहे.

त्यातच, जिल्ह्यात ० ते १५ या वयोगटात कोरोना झालेल्या बालकांच्या आकडेवारीत एकूण ३४ हजार ७८० बालकांना त्याची लागण झाली तर २० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या वर्षभरात १८ हजार ८९९ बालकांची कोरोनाग्रस्त म्हणून नोंद झाली आहे. त्यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मार्च ते मे २०२१ या तीन महिन्यांच्या कालावधीत जवळपास १५ हजार ८८१ बालक कोरोना ग्रस्त झाले होते. हा आकडा जरी मोठा असला तरी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

‘जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाग्रस्त लहान मुलांची नोंद झाली आहे. त्यातच २० जणांचा मृत्यूही झालेला आहे. पण, मोठ्यांप्रमाणे लहान मुलांमध्ये लक्षणे अद्यापही दिसून आलेली नाहीतर, मात्र तिसर्‍या लाटेत संभाव्य धोका हा लहान मुलांना असल्याने त्यादृष्टीने बेड्स, ऑक्सिजन, औषध आणि इतर साहित्य घेतले आहे. लहान मुलांमध्ये निश्चित लक्षणे नाहीत. ती दिसून आल्यावर त्याच्यावर गाईडलाईनप्रमाणे योग्य उपचार केले जातील. ”
– डॉ. कैलाश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -