घरठाणेडोंबिवलीत बालकांसाठी पन्नास बेडचे रिझर्व्हेशन

डोंबिवलीत बालकांसाठी पन्नास बेडचे रिझर्व्हेशन

Subscribe

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी तयारी

कोरोना संसर्गामुळे कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात पहिल्या लाटेपेक्षा दुसर्‍या लाटेत रुग्णसंख्या वाढली असतानाच मृतांचा आकडा देखील वाढीस लागला आहे. या लाटेमध्ये ५ हजार २६८ मुलांना संक्रमित केले असताना दुसर्‍या लाटेत अवघ्या तीन महिन्यात २ हजार १८३ मुलांना संसर्ग झाला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने तिसर्‍या लाटेची वाट न पाहता मुलांकरता डोंबिवली विभागातील बंद असणार्‍या विभा मेकॅनिक कंपनीत पन्नास बेडची पूर्वतयारी म्हणून व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील यांनी दिली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर परिसरातील वैद्यकीय स्त्रोतांविषयी संपूर्ण माहिती गोळा केली जात असून महानगरातील भागात सर्व सुविधा असलेल्या मुलांसाठी किती रुग्णालये सुसज्ज स्थितीत आहे. याची चाचपणी करण्याचे काम प्रशासन करीत आहे. तिसर्‍या लाटेत नवजात मुलांच्या उपचारासाठी सुविधा आहेत की नाही जेणेकरून त्यांच्यावर उपचाराच्या व्यवस्थेत कोणतीही कमतरता भासू नये. याबाबत प्रशासन विचार करीत आहे.

- Advertisement -

डोंबिवलीतील बंद असलेल्या एका कारखान्यात तिसर्‍या लाटेकरता लहान मुलांवर उपचार करण्यासाठी ५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने २५ बेड अतिदक्षता विभाग तर उर्वरित २५ बेड ऑक्सिजनयुक्त रिझर्व्ह ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली आहे. लहान मुलांकरता स्पेशल हॉस्पिटलची मंजुरी अद्याप मिळाली नसून मंजुरी मिळाल्यानंतर लहान बालकांसाठी या रुग्णालयात विशेष सोय उपलब्ध होणार असल्याचेही डॉ.अश्विनी पाटील यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -