ठाण्यात सरकारी रुग्णालयात 18 वर्षांवरील सर्वांना मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात

४४ लाख ३९ हजार १६७ नागरीक बुस्टर डोस साठी पात्र

corona vaccination Free booster dose started for all 18 years age at Government Hospital in Thane

ठाणे जिल्ह्यात १८ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना शासकीय लसीकरण केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बुस्टर डोस आज पासून मोफत देण्यात येत आहे. जिल्ह्यात बुस्टर डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या नागरिकांची संख्या ४४ लाख ३९ हजार १६७ इतकी असून लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिने किंवा २६ आठवड्याचा कालावधी पुर्ण झालेले नागरीक प्रिकॉशन डोससाठी पात्र असणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

हेही वाचा : ठाण्यात संततधार सुरूच

जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. बुस्टर डोस घ्यायला येताना नागरिकांनी दोन डोस घेतलेले प्रमाणपत्र व नोंदणी कृत मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन नोंदणी तसेच थेट लसीकरण केंद्रांवर जाऊनही हा डोस घेता येईल, असे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी यांनी सांगितले.पात्र नागरिकांनी बुस्टर डोस घ्यावेत असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष गोटिराम पवार, आरोग्य व बांधकाम सभापती वंदना भांडे यांनी केले आहे.


संसद भवन परिसरात निदर्शनं, आंदोलनं, उपोषण करण्यास बंदी; धार्मिक कृतींनाही मनाई