Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे ठाणे महापालिका लसीकरणात आघाडीवर

ठाणे महापालिका लसीकरणात आघाडीवर

जिल्ह्यात ४ लाख २३ हजार १५० जणांचे लसीकरण, आतापर्यंत १ लाख ८९ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची लसीकरणाला पसंती

Related Story

- Advertisement -

सहा महापालिकांसह दोन नगरपालिका तसेच शहापूर आणि मुरबाड या सारखा ग्रामीण भाग लाभलेल्या ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ४ लाख २३ हजार १५० नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे. त्यामध्ये ३ लाख ५९ हजार ७०१ नागरिकांना पहिला डोस दिला गेला आहे. लसीकरणाला 16 जानेवारी 2021 पासून सुरुवात करण्यात आली होती. विशेष म्हणजे ६० वर्षांवरील १ लाख ८९ हजार १७१ नागरिकांचे यशस्वीरित्या लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत झालेल्या लसीकरणाचा आकडा जरी मोठा वाढत असला तरी जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाचे प्रमाण हे खूप कमी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

त्यातच, १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या लसीकरणात ४५ वरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी शासकीय यंत्रणेची कसोटी लागणार आहे. मात्र त्याबाबतचे नियोजन संबंधित प्रशासकीय यंत्रणेमार्फत करणे सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

जिल्ह्यात झपाट्याने रुग्ण वाढणार्‍या कल्याण डोंबिवलीत मात्र लसीकरणाचे प्रमाण मीरा-भाईंदर आणि ठाणे ग्रामीण यांच्या पेक्षाही कमी असल्याचे शासकीय आकडेवारी स्पष्ट दिसत आहे. तर ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक लसीकरण झाले असून येथे एक लाख ३६ हजार १५८ जणांना लस दिली गेली आहे.तर नवीमुंबईत ही ९९ हजार ४९३ जणांनी लस घेतली आहे. मात्र रुग्ण संख्या कमी असलेल्या उल्हासनगर आणि भिवंडी लसीकरणाचे प्रमाण ही कमी असल्याचे दिसून येत आहे. त्या- त्या ठिकाणी १२ हजारांच्या आसपास एकूण लसीकरण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

2011 मध्ये झालेल्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही १ कोटी १० लाख ५४ हजारांहून अधिक आहे. तर जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण ८५ टक्के इतके आहे. तसेच सहा महापालिका आणि दोन नगरपालिका तसेच जिल्हा परिषद ही अस्तित्वात आहे. शहरी आणि ग्रामीण अश्या दोन भागात जिल्हा विभागाला गेला आहे.अजून ही शहापूर आणि मुरबाड या तालुक्यात मोठ्याप्रमाणात आदिवासी लोकवस्ती आहे. तर शहरी भाग हा दाटीवाटीने पसरलेला आहे. त्यातच परराज्यातून आलेल्या लोकांची संख्या ही जास्त असून नोकरदारांची संख्या अधिक आहे.

- Advertisement -

ठाणे,दिवा,डोंबिवली, कल्याण, बदलापूर या ठिकाणाहून मोठ्याप्रमाणात(लाखोंनी) नागरिक लोकलने दररोज ये -जा करतात. त्यामुळे ही रेल्वे असो या एसटी स्थानक गर्दीने नेहमी गजबजलेली असतात. दरवर्षी जिल्ह्यातुन हजारो नागरिक कामानिमित्त किंवा फिरण्यासाठी परदेशात जातात. परदेशातून आलेल्या नागरिकांमुळे कोरोनाचा पसारा झाला आतापर्यंत (३०मार्च) जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या तीन लाख १५ हजार ८४० इतकी आहे. त्यातील दोन लाख ७९ हजार ५३२ जण कोरोना मुक्त झाले असून सध्याच्या घडीला २९ हजार ८३९ बाधितांवर उपचार सुरू आहे. तर ६ हजार ४६९ जण कोरोनाने दगावले आहेत.

कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यावर हेल्थ वर्कर आणि फ्रंट वर्कर यांना लस दिली गेली. त्यानंतर,पोलीस आणि मग ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येत आहे. तसेच उद्यापासून आता ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणेमार्फत १०९ शासकीय आणि ५३ खासगी केंद्रात लसीकरण सुरू आहे. अशा या १६२ लसीकरण केंद्रांवर १९ हजार ८५० दिवसाचे टार्गेट आहे. तर प्रत्येक केंद्रांना १०० ते २०० चे टार्गेट आहे. उद्यापासून आणखी काही लसीकरण केंद्र वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार आतापर्यंत (३० मार्च) ४ लाख २३ हजार १५० जण पूर्ण झाले आहे. आतापर्यंत हेल्थवर्कर यांनी ७८,४५५ पहिला तर ४०,८३६ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. फ्रंड वर्कर यांनी ५४,९८७ पहिला तर २२,६१३ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ ते ६० दरम्यान २२ हजार ६१३ जणांनी तर ६० वर्षांवरील १ लाख ८९ हजार १७१ नागरिकांनी डोस घेतला आहे.

ग्रामीण भागात शासकीय लसीकरण केंद्र जास्त
जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणासाठी जास्तीतजास्त शासकीय केंद्र सुरू करण्यावर भर दिला गेला आहे. १० रुग्णालयासह २८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण केले जात आहे. अशाप्रकारे ३८ शासकीय केंद्रांव्यतिरिक्त ६ खासगी लसीकरण केंद्र सुरू आहेत. ग्रामीण भागात अद्यापही कोणतेही सुरू केले केंद्र बंद करण्याची वेळ ओढवलेली नाही. सध्या आठ दिवस लसीकरण केंद्र सुरू राहतील इतका लसीचा साठा उपलब्ध असल्याची माहिती डॉ. अंजली चौधरी यांनी दिली.

- Advertisement -