घरठाणेकोरोनाच्या आव्हानाला सामोरे जाणार

कोरोनाच्या आव्हानाला सामोरे जाणार

Subscribe

 टोरेंट पॉवर ग्रुप राबवणार विविध उपक्रम

टोरेंट ग्रुपने संकटाच्या वेळी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. टोरेंट ग्रुपचे अध्यक्ष समीर मेहता यांनी नुकतीच एका ऑनलाइन बैठकीत सांगितले की, शासकीय रुग्णालयांमध्ये त्वरित आधार म्हणून आणि दीर्घकालीन टिकाऊ पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी टोरेंट ग्रुपने अनेक पुढाकार घेतला आहे. यामुळे केवळ सध्याची परिस्थिती सुलभ होण्यास मदत होणार नाही, तर भविष्यातील कोणत्याही आरोग्याच्या संकटासाठी सरकारच्या प्रयत्नांनाही मदत होईल.
टोरेंट ग्रुपने कोविड १९ रूग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीसाठीसाठी कंपनीने उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणामधील विविध शासकीय रुग्णालयांना ५० प्रेशर स्विंग एडजोर्प्शन मेडिकल ऑक्सिजन प्लांट दिले आहेत.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १८ मॅट्रिक टॅन चे २ क्रायोजेनिक टँकर तैनात केले आहेत. तसेच रुग्णालयांना १,००० ऑक्सिजन सिलिंडर, २०० ऑक्सिजन कॉन्सर्न्ट्रेटर  इत्यादी देण्यात आले आहेत. बॉटलिंगची सुविधा असलेला ऑक्सिजन जनरेशनचा एक प्रकल्प अहमदाबादमध्ये स्थापित करण्यात आला आहे. ज्यामुळे आसपासच्या भागात विनामूल्य ऑक्सिजन उपलब्ध केले जात आहे.

- Advertisement -

या उपक्रमांद्वारे, दररोज अंदाजे १०,००० रुग्णांच्या ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय टोरेंट ग्रुप गरजूंना O2FLO – हाय फ्लो थेरपी युनिट, व्हेंटीलेटर, अँटीजेन किट, मेडिसिन किट, रेशन किट यासारखी मदत सामग्रीही देत आहे. कंपनीने माहिती दिली की भिवंडीसह ठाणे जिल्ह्यात दोन ते तीन ऑक्सिजन प्लांट्स उभारण्यासाठी आणि त्या भागात ८०-१०० ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यासाठी ते प्रशासनाशी चर्चा करीत आहेत. अशाप्रकारे कोरोना काळात टोरेंट ग्रुपद्वारे विविध सेवा कामे केली जात आहेत.

” भिवंडीसह ठाणे जिल्ह्यात नवीन ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरीता आणि त्यातून 80 ते 100 सिलिंडरची व्यवस्था होईल. या संदर्भात कंपनीची संबंधित यंत्रणांशी चर्चा सुरू आहे
– चेतन बदियानी, जनसंपर्क अधिकारी, टोरंट पॉवर,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -