घरठाणेमराठी उखाण्यामधून कोरोनाची अनोखी पद्धतीने 'जनजागृती'

मराठी उखाण्यामधून कोरोनाची अनोखी पद्धतीने ‘जनजागृती’

Subscribe

लग्न झाल्यावर बहुतांश लोकांमध्ये एक टिपिकल पद्धत आहे. ती म्हणजे लक्ष्मीच्या पावलाने घरी येणाऱ्या नववधूने उखाणे घेण्याची आहे. अशाच उखाण्यामधून मज्जेशीर सोशल मीडियावर कोरोना नियमावलीचे अनोख्या पध्दतीने कसे पालन केले पाहिजे, याचे ८ उखाण्यांचा मॅसेज फिरत आहे. यामध्ये हंड्यांवर हांडयापासून ते चांदीच्या ताटात कापून ठेवले सफरचंदाच्या काप्यापर्यंत उखण्यामधून जगजागृतीचा संदेश दिलेला आहे.

कोविड -१९ चा संसर्ग गेल्या दोन वर्ष कमी अधिक प्रमाण पाहण्यास मिळत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी काय केले पाहिजेत व काय नाही केले पाहीजेल. याबाबत आरोग्य यंत्रणा असो या शासकीय यंत्रणांनी सोशल मीडियाच्या चांगलाच वापर केला आहे. सद्यस्थितीत एखादी छोट्यातील छोटी गोष्ट जरी सोशल मीडियावर पडली की ती वाऱ्यासारखी पसरत आहे. त्यातच आता मराठी उखाण्यांचे एक संदेश सोशल मीडियावर चांगले फिरताना दिसत आहे. या उखाण्यातून जनजागृती करताना काळजी घ्या, सुरक्षित राहा. असेही म्हटले आहे. हे उखाणे वाचून नागरिकांच्या मनावर कळतन कळत आलेल्या ताण कमी होत आहे. एक प्रकारे नागरिकांच्या गालावर पुन्हा खळी पडतानाही दिसत आहे

- Advertisement -

असे आहेत ते उखाणे

हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात, कोरोनाला हरवायला,बसा आपापल्या घरात.
मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर, सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर.
शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून, रोजचे व्यवहार करा सोशल डिस्टंसिंग राखून.
शिरा बनवायला तूप, साखर, वेलची व रवा आणला जाडा,रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा.
ताजमहल, कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,लक्षण दिसली कोरोना ची तर डॉक्टरना भेटा थेट.
काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले, कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले.
चिमणीला म्हणतात चिऊ,कावळ्याला म्हणतात काऊ,आपण घरीच सुरक्षित राहू, विनाकारण बाहेर नका जाऊ.
चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -