Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे मनुष्यबळाअभावी कोविड रुग्णालय बंदच

मनुष्यबळाअभावी कोविड रुग्णालय बंदच

Related Story

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी भिवंडीतील सवाद येथे जिल्हा कोविड रुग्णालयाचे उद्घाटन झाले. मात्र, या रुग्णालयासाठी मनुष्यबळाची गरज लागणार आहे. कमी वेतनामुळे आवश्यक वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मिळत नसल्याने ते अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे रुग्णांमध्ये चिंता पसरली आहे. दरम्यान, सोमवारपासून रुग्णालयात चार डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, तरी एकही रुग्ण येथे फिरकला नाही, अशी प्रतिक्रिया प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली. दोन लाख चौरस फुटांच्या या रुग्णालयात ८१८ बेड्स आहेत. या कोविड रुग्णालयाचा फायदा भिवंडी, शहापूरसह कल्याण, मुरबाड या तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांबरोबरच शहरी भागातील रुग्णांनाही होणार असल्याची ग्वाही स्वतः जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी दिली होती.

- Advertisement -

मात्र उद्घाटनानंतरही रुग्णालय सुरू झाले नसल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची चिंता वाढली आहे. रुग्णालय बंद असल्याचा फटका नागरिकांना बसत असून नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत असल्याने आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने रुग्णालय सुरू केले. रुग्णालयात ३६० महिला, ३७९ पुरुषांसाठी ऑक्सिजन बेड असून ८८ अतिदक्षता बेड, ज्यात २० व्हेंटिलेटर, २० बायपॅक व ४० हायफ्लो नेझल कॅनॉल सुविधा असलेले एकूण ८१८ बेड्स आहेत.

प्रशासनाने तातडीने योग्य ते मनुष्यबळ पुरवून रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागणार नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर हे रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

- Advertisement -