घरठाणेठाणे जिल्ह्यात रुग्ण संख्येबरोबर मृतांचा आकडा ही वाढला

ठाणे जिल्ह्यात रुग्ण संख्येबरोबर मृतांचा आकडा ही वाढला

Subscribe

सहा हजार १७६ नवे रुग्ण तर २६ जण दगावले

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी नव्या रुग्णांच्या संख्येबरोबर दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. आज ६ हजार १७६ रुग्णांची नोंद झाली असून २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या आकड्यावरून जिल्ह्यात आता ३ लाख ६७ हजार ६१० रुग्णांची नोंद झाली. तर मृतांची संख्या ६ हजार ६६४ झाली आहे. केडीएमसीत सर्वाधिक दोन हजार १९ नवीन रुग्ण आढळून आले असून ठाण्यात सर्वात जास्त ६ रुग्ण दगावल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

ठाणे शहर परिसरात १ हजार ८२५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ९२ हजार ५६२ झाली आहे. शहरात ६ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या १ हजार ४९३ झाली आहे. पाठोपाठ कल्याण – डोंबिवलीतही संख्या वाढतेच असून याठिकाणी २ हजार ०१९ रुग्णांची वाढ झाली असून ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबईत १ हजार ०३३ रुग्णांची वाढ झाली असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. उल्हासनगरमध्ये २५५ रुग्ण सापडले आहेत भिवंडीत ९५ बाधीतांची नोंद झाली असून तिघे दगावले आहेत. मीरा भाईंदरमध्ये ३९७ रुग्ण आढळले असून ५ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. अंबरनाथमध्ये २२२ रुग्ण आढळले असून एकाच्या मृत्यूची नोंद आहे. बदलापूरमध्ये १९० रुग्णांची नोंद झाली आहे. ठाणे ग्रामीणमध्ये १४० नवे रुग्ण वाढले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -