घरठाणेक्राईम ब्रँचची धाड; २१ रेमडीसीवर इंजेक्शनसह दोघांना अटक

क्राईम ब्रँचची धाड; २१ रेमडीसीवर इंजेक्शनसह दोघांना अटक

Subscribe

समाजसेवक डॉ. विनू वर्गिस यांच्या मदतीने आरोपींना अटक

राज्यात कोरोना महामरीचे संकट आले आहे. कोरोना रुग्णसंख्येच्या मृत्यू संख्येतही भर पडलेली आहे. कालपासून ठाण्यात रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला होता. हे इंजेक्शन कोरोनावर जीवन रक्षक औषध म्हणून उपयोगी ठरत आहे. त्यामुळे या औषधाचा काळाबाजार होत असल्याचे प्रकार समोर आले होते. आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या काळ्या बाजाराबद्दल कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आज ठाण्यात तीन हात नाका येथून रेमेडीसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे व त्यांच्याकडून २१ रेमेडीसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आल्या आहेत.

रेमेडीसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे ठाण्यात कालपासून मेडिकलच्या बाहेर मोठ्या रांगा पाहायला मिळत होत्या. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले होते. आज ठाण्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनू वर्गिस यांच्या मदतीने क्राईम ब्रांचने रेमेडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत त्यांच्याकडून २१ इंजेक्शन जप्त करत दोघा जणांना अटक अटक केली आहे. आतीफ फरोग अंजुम (वय२२) आणि प्रमोद सखाराम ठाकूर (वय३१) ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधीक तपास खंडणी विरोधी पथक ठाणे शहर करत आहे. अशाप्रकारे फसवणूक झालेल्या पीडित नागरिकांनी तक्रार करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाच्या दूरध्वनी वर संपर्क साधावा तसेच पोलिस स्टेशनला माहिती कळवावी असे आवाहन खंडणी विरोधी पखकाने केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -