घरठाणेउल्हासनगरात पाच जणांवर क्रिकेट बेटिंगचा गुन्हा

उल्हासनगरात पाच जणांवर क्रिकेट बेटिंगचा गुन्हा

Subscribe

कॅम्प नंबर पाच येथील प्रभाराम मंदिर परिसरात शनिवारी क्रिकेट वर्ल्डकपच्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया लाईव्ह सामन्यावर क्रिकेट बेटिंग खेळणार्‍या पाच जणांविरुद्ध हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट राऊटर समवेत इतर साहित्य हस्तगत केले. उल्हासनगरात गेली काही दिवसांपासून क्रिकेट बेटिंग खेळण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु ही बेटिंग कुठे खेळण्यात येत आहे. त्याचा सुगावा लागत नव्हता, मात्र प्रभाराम मंदिर महावितरण कार्यालयाच्या बाजूला वर्ल्डकपच्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट सामन्यावर क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची माहिती हिललाईन पोलिसांना मिळाली.

शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून सुमित नवीन मोटवानी, दिनेश मुरलीधर रोहरा, भारत मोहन राजपालरॉय आणि नरेश रोहिडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या वेळी सट्टा खेळतांना विशाल आणि कशिश सावलानी यांच्या कोटक महेंद्र बँक खात्याचा वापर या पाच जणांनी करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले. क्रिकेट सट्टा प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून क्रिकेट सट्टासाठी वापरण्यात आलेले मोबाईल, लॅपटॉप, इंटरनेट राउटर आदी साहित्य जप्त केले आहे. या पाच जणांपैकी नरेश रोहिडा हा व्यापर्‍यांची महापंचायत समितीचा पदाधिकारी असून शिवाय तो पूर्वी भाजपचा उपाध्यक्ष देखील होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -