घरठाणेकल्याण-डोंबिवलीत फटाक्यांची आतषबाजी करणार्‍या 154 जणांवर गुन्हे

कल्याण-डोंबिवलीत फटाक्यांची आतषबाजी करणार्‍या 154 जणांवर गुन्हे

Subscribe

कठोर कारवाईचा इशारा

कल्याण, डोंंबिवली शहरांमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता फटाके वाजवून प्रदूषण करणार्‍या 154 जणांवर पोलिसांनी विविध कलमान्वये कारवाई केली आहे. आता दिवाळी संपली आहे, तरीही नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी सुरूच ठेवली तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिला आहे.

दिवाळी सुरू होताच सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांनी नागरिकांना फटाके मुक्त, प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढून त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. उच्च न्यायालयाने फटाके फोडण्यासाठी रात्री आठ ते दहा ही वेळ निश्चित केली होती. तरीही अनेक नागरिकांनी या वेळेचे बंधन झुगारून प्रदुषणात भर पडेल अशा पद्धतीने फटाके फोडले. न्यायालय, पालिका, पोलीस प्रशासनाने आवाहन करूनही जे नागरिक फटाके फोडून प्रदुषणात भर घालत होते. अशा कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील 154 जणांवर मागील चार दिवसाच्या कालावधीत विविध कलमान्वये विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत, असे कुराडे यांनी सांगितले.

- Advertisement -

गुन्हे दाखल नागरिकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, आता दिवाळी संपली आहे. तरीही नागरिकांनी फटाके फोडण्याचे प्रकार सुरूच ठेवले. प्रदुषणात भर घालून नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांनी सांगितले. फटाक्यांच्या धुराचा ज्येष्ठ नागरिक, वृध्द, लहान बालके यांना सर्वाधिक त्रास होतो. आता परिक्षांचा काळ आहे. अनेक विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्यांनाही फटाक्यांच्या ध्वनी प्रदुषणाचा त्रास होतो याचे भान नागरिकांनी बाळगावे, असे आवाहन कुराडे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -