घरठाणेटिटवाळा रोड एनआरसीमधील धोकादायक चिमणी जमीनदोस्त

टिटवाळा रोड एनआरसीमधील धोकादायक चिमणी जमीनदोस्त

Subscribe

एनआरसी लिमिटेडच्या कंपाऊंडमध्ये स्थित असलेली ५० मीटर उंचीची चिमणी पाडण्यात आली आहे. ही चिमणी टिटवाळा रोडवरील रहदारीला आणि आंबिवली स्टेटशनवरील प्रवाशांसाठी धोकादायक झाली होती. ती आज सर्व सुरक्षेचे उपाय योजून पाडण्यात आली.आरसीसीचे बांधकाम असलेली चिमणी ज्यावेळी एनआरसी कपंनीचा प्रकल्प सुरु झाला त्यावेळी म्हणजे १९५० साली बांधण्यात आली होती. पण २००९ साली कपंनी बंद पडली तेंव्हापासून धोकादायक झाली होती. चिमणीची या काळात वाताहत झाली होती आणि सर्व सबंधित यंत्रणांनी म्हणजे रेल्वे, केडीएमसी व खडकपाडा पोलीस स्टेशन यांनी ही चिमणी पाडण्यासाठी वेळोवेळी नोटीसा बजावल्या होत्या.

एनआरसी कंपनी विरोधात एनसीएलटीमध्ये २०१८ मध्ये दिवाळखोरी संहितेखाली दावा दाखल करण्यात आला. मार्च २०२० मध्ये एनसीएलटी ने दिलेल्या निकालानुसार अदाणी समूहाने सर्व प्रक्रिया पूर्ण करून सप्टेंबर २०२० मध्ये ताबा कंपनीचा ताबा घेतला. त्यानंतर एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या नात्याने ही धोकादायक चिमणी तात्काळ पडण्याचा निर्णय अडाणी समूहाने घेतला. अडाणी समूहाच्या प्रकल्प टीमने ही चिमणी पोलीस, केडीएमसी व एमईसीबी यांच्या सहकार्याने हि चिमणी उतरवली. यावेळी खडकपाडा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी टिटवाळा-आंबिवली रस्ता बंद केला होता व परिसरात सतत दोन दिवस गस्त घालून जनजागृती केली. ही चिमणी खाली आल्यावर रेल्वे व केडीएमसी अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

- Advertisement -

अदाणी समूहाने जारी केलेल्या निवेदनानुसार आता कंपनीच्या आवारातील अन्य दोन आरसीसी चिमण्या व चार स्टीलच्या चिमण्या ही लवकरच पाडण्यात येतील. अदाणी समूहाकडून या जागी जागतिक दर्जाचं लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यात येणार आहे आणि या प्रकल्पाचा मास्टर प्लॅन बनवण्यासाठी रेल्वे व केडीएमसी सोबत चर्चा सुरु केली आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -