घरठाणेउल्हास नदीतून आपटी ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास

उल्हास नदीतून आपटी ग्रामस्थांचा धोकादायक प्रवास

Subscribe

रोजगारासाठी नागरिकांची जीवघेणी कसरत

कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी या शेतीप्रधान गावातील ग्रामस्थ आणि तरुणांना रस्त्याच्या अभावामुळे अत्यंत धोकादायक प्रवास करावा लागत आहे. याकडे स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाले आहे. अंबरनाथ, बदलापूर येथे एमआयडीसी झाल्याने आजूबाजूच्या आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा आदी गावातील तरुण येथे कामधंद्यानिमित्ताने उल्हास नदीतून जात-येत होते.

येथे उल्हास बारवी नदीचा संगम होत असल्याने जांभूळ एमआयडीसीने येथे पाणसाठवण बंधारा बांधला होता. वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेली शहरे यांना पाणी पुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसीने आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली. तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद आदी गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मीटर रुंंदीची साधारण ५०० मीटर लांबीची पायवाट बनवून दिली होती. येथूनच गावकऱ्यांची ये-जा सुरू होती. परंतु मागील एक दोन वर्षांपूर्वी आलेल्या पुरामुळे या पायवाटेचा काही भाग वाहून गेला आहे.

- Advertisement -

त्यामुळे या लोकांचा रस्ता बंद झाला. आपटी गावातील तरुण विनोद शिसवे, भानुदास भोईर, सुरज भेरले, चेतन शिसवे, विघ्नेश म्हसकर, विजय शिसवे, दिपक शिसवे तूकाराम शिसवे, प्रदिप म्हसकर, भारत शिसवे, विशाल भेरले, किरन शिसवे, रामचंद्र शिसवे, उमेश शिसवे, राजेश शिसवे, गणेश शिसवे असे अनेक ग्रामस्थ तरुणांचा रस्ता बंद झाल्याने रोजगारही बंद झाला. या मार्गाशिवाय दुसर-या मार्गाने जायचे असेल तर वीस ते पंचवीस किमी अंतर वळसा घालून जावे लागत असल्याने येथील ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली.

त्यातही अनेकांनी पायवाटेवरून जीवाचा धोका पत्करून ये-जा सुरू केली आहे. अनेकजण वाटेवरुन दुचाकीही घेऊन जाण्याचा धोका पत्करत आहेत. या वाटेला कठडा किंवा इतर काहीही सुरक्षा नाही. त्यामुळे तोल गेल्यास थेट नदीपात्रात पडून जलसमाधीचा धोका आहे. याबाबत स्थानिक नेते, लोकप्रतिनिधी आणि संबंधित सरकारी  अधिका-यांकडेही तक्रारी झाल्यास आहेत. मात्र कार्यवाही अद्याप झालेली नाही.

- Advertisement -

आमच्या या जीवघेण्या प्रवासाबद्दल आम्ही आमदार, खासदार, एमआयडीसीचे अधिकारी या सर्वांना सांगितले, पण अद्याप कोणी लक्ष दिले नाही.
-विनोद शिसवे, ग्रामस्थ, आपटीगाव

या रस्त्यावर जातांना येताना अनेकांचे जीव गेले आहेत. अजून कितीजणांचा बळी गेल्यावर संबंधितांना जाग येईल ?
-शत्रुघ्न शिसवे, पोलीस पाटील, आपटीगाव. तालुका कल्याण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -