घरठाणेमाळशेज घाटात 52 वर्षीय ट्रेकरचा मृत्यू

माळशेज घाटात 52 वर्षीय ट्रेकरचा मृत्यू

Subscribe

तालुक्यातील निसर्गरम्य माळशेजघाट परिसरात नाशिक वरून 15 ट्रेकर्स ट्रेकिंग साठी आले होते. ते माळशेज घाटाच्या पर्यटन निवासा शेजारील खोल दरीत उतरले. त्या ठिकाणी 5 ट्रेकर्स अडकलेले होते. अडकलेल्या ट्रेकर्सला काढण्यासाठी अथक प्रयत्न रविवारी दिवसभर चालू होता. शेवटी शिवनेरी ट्रेकर्सच्या माध्यमातून काही सदस्यांना वाचवण्यात यश आले. जवळपास 15 पैकी 14 सदस्यांना वाचवण्यात यश आल, मात्र एका ट्रेकर्सचा दुर्दैवी मध्ये मृत्यू झाला आहे.
किरण काळे, नाशिक एलआयसी मध्ये काम करणार्‍या 52 वर्षी ट्रेकर्सचा खोल दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माळशेज घाट परिसरात दरवर्षी शेकडो पर्यटक येत असतात. या प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील संसारे, एकनाथ बदे, पोलीस अंमलदार विकास पाटील , तसेच पोलीस मित्र राजू ,पोलीस उपविभागीय अधिकारी राम भालसिंग, मुरबाड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे हे घटनास्थळी हजर राहून परिस्थिती वर नियंत्रण ठेऊन रेस्कु टिम-जुन्नर, शिवनेरी, लोणावळा, नाशिक यांना सहकार्य करीत होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -