Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ठाणे लॉकडाऊन हटवा, धार्मिक स्थळांवरील प्रवेश सुरू करा

लॉकडाऊन हटवा, धार्मिक स्थळांवरील प्रवेश सुरू करा

एमआयएमचे भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्य शासनाने राज्यभर संचारबंदीसह कडक निर्बंध आणि विकेंड लॉकडाऊन जाहीर केले आहे. मात्र हे लॉकडाऊन असंवैधानिक असल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्यावा, तसेच सर्व धार्मिक स्थळे खुली करावी या मागणीसाठी सोमवारी एमआयएमचे भिवंडी शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आपल्या मागण्यांचे लेखी निवेदन देखील एमआयएमच्या शिष्ठमंडळाने प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार गोसावी यांच्याकडे सुपूर्द केले.कोरोना संकट वाढल्याच्या नावाखाली भिवंडी शहरात ६ एप्रिल पासून अचानक लाकडाऊन जाहीर करून व्यापारी व कामगार वर्ग यांच्यावर मोठा अन्याय केलेला आहे. विशेष म्हणजे हा लॉकडाऊन असंवैधानीक असल्याचा आरोप देखील एमआयएमच्या वतीने करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

लॉकडाऊन मध्ये मोठ्या व्यापाऱ्यांना सूट देण्यात आली असली तरी छोटे व्यापारी आणि कामगारांवर दुकाने बंद ठेवल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.कोरोना संकटामुळे मागील एका वर्षापासून लॉकडाऊनच्या कालावधीपासून सर्वसामान्य व व्यापारी वर्गाची स्थिती अत्यंत हालाखीची झालेली आहे. त्यामुळे हा लॉकडाऊन शासनाने मागे घ्यावा अशी विनंती एमआयएमच्या वतीने करण्यात आली असून भिवंडी शहरात औषध उपचारांचा तुटवडा असून शहरात वॅक्सीन, रेमडीसीवीर इंजेक्शन, वेंटीलेटर, ऑक्सीजन तसेच रुग्णालयात बेड उपलब्ध होताना अनेक अडचणी येत आहेत. या सुविधा उपलब्ध करण्यात प्रशासन अपयशी ठरत असून दुसरीकडे नागरिकांना प्रार्थना करण्यासाठी आवश्यक असलेली धार्मिक स्थळे देखील शासनाने बंद केली आहेत.

मागील लॉकडाऊन कालावधीतील वीज बिल देखील माफ केली नाहीत. तसेच शाळेची फि देखील माफ केलेली नाही. लॉकडाऊन कालाधीत लोकांकडे काम नसल्यामुळे आणि व्यापार व्यवसाय नोकरी बंद असल्याने त्याचेकडे घरखर्चकरीता पैसे नसतांना सक्तीची वसुली केलेली आहे. त्यातच आता नव्याने लॉकडाऊन केलेमुळे लोकांना आर्थिक संकटांचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे सरकार लोकांच्या जिवाशी खेळने बंद करावे त्यासाठी लॉक डाऊन हटवावे. तसेच धार्मिक स्थळे सुरु करावी अशी मागणी एमआयएमचे शहर कार्याध्यक्ष शादाब उस्मानी यांनी या धारणे आंदोलनादरम्यान केली आहे.

- Advertisement -