धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्यात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात यंदाही मध्यरात्री ध्वजारोहण करण्यात आले. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, ठाकरे गटातील राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. (Despite serving notice, Rajan vichare, Kedar Dighe attends flag hoisting program, Shinde said…)
हेही वाचा – मध्यरात्री ध्वजारोहण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जपली ठाण्यातील 40 वर्षांपूर्वीची परंपरा
ठाकरे गटातील राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख केदार दिघे यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मात्र, त्यानतंरही ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यामुळे काहीवेळ येथे वातावरण तापले होते. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.
शिवसेना कोणत्याही दडपशाहीला घाबरणार नाही.
प्रतिवर्षाच्या परंपरेनुसार ठाणे येथील शिवसेना जिल्हा शाखा येथे आज रात्री बारा वाजता ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला सर्व शिवसैनिकांसोबत जाणारच.!
सर्व स्वातंत्र्यप्रेमींनी देखील या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित रहावे ही विनंती.@shivsena— Rajan Vichare – राजन विचारे (@rajanvichare) August 14, 2022
ध्वजारोहण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्याबाबत प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला असता, “पोलिसांना सूचना देण्यात आल्या होत्या. ज्यांना या ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहायचे आहे, त्यांना येऊ द्या असे सांगितले होते”, असे शिंदे यांनी म्हटले.
हेही वाचा – नागरिकांच्या सुरक्षेसाठी ‘नौपाडा रक्षक’ अभियान, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
“भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत आहे. सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. ज्ञात अज्ञात सेनानींनी आपल्याला स्वातंत्र्य दिले. त्यांना अभिवादन करतो. ठाण्यात आनंद दिघे यांनी ही परंपरा सुरू केली त्याचा आनंद होतोय, राज्यातही घराघरावर तिरंगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला”, असेही ध्वजारोहणानंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे शहरात सुरू केलेल्या परंपरेनुसार ठाणे शहर मध्यवर्ती शिवसेना शाखेच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्यरात्री ध्वजारोहणाचा सोहळा संपन्न#स्वातंत्र्यदिन #IndiaAt75 #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/xnwXLlncwc
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 14, 2022