घरठाणेकेडीएमसीत नागरी सुविधांचा बोजवारा

केडीएमसीत नागरी सुविधांचा बोजवारा

Subscribe

नागरी सुविधांचा कसा बोजवारा उडतो त्याचे कल्याण डोंबिवली महापालिका हे उत्तम उदाहरण आहे, अशी टीका माहिती अधिकार कार्यकर्ते तथा जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांनी केले.

आपण नागरिक या देशाचे मालक आहोत. आपण मालक असल्याचा आपल्याला विसर पडला आपण देशाचे मालक असल्याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना व्हायला हवी. नागरिकांनी चांगले कार्यकर्ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले पाहिजेत. तसे निवडून दिले नाहीत तर नागरी सुविधांचा कसा बोजवारा उडतो त्याचे कल्याण डोंबिवली महापालिका हे उत्तम उदाहरण आहे, अशी टीका माहिती अधिकार कार्यकर्ते तथा जागरूक नागरिक मंचचे अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांनी नुकतेच कल्याण येथे बोलताना केले.

आम आदमी पार्टीच्या वतीने नागरी समस्या व त्यावरील उपाय या विषयावर शहरातील सामाजिक संस्थांचे एक चर्चासत्र कल्याण पूर्वेतील आई तिसाई मॅरेज हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आपचे नेते तथा माजी सनदी अधिकारी किशोर मानध्यान, राष्ट्रीय सहसचिव रुबेन मस्करेहान्स, डॉ. संतोष करमरकर, योगगुरू सोमदेव महाराज, कल्याण डोंबिवली महानगर अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी घाणेकर पुढे म्हणाले की, कल्याणच्या तत्कालीन आमदारांनी एप्रिल २०१२ मध्ये ३५० खाटांचे महापालिकेच्या मालकीचे रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयासह राज्य शासनाकडून मंजूर करून आणले. पुढे महापालिकेने ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधून करण्याचा ठराव केला. त्यासाठी टिटवाळा येथे ३८ एकर जागा आरक्षित आहे. जानेवारी २०२१ पर्यंत त्यात प्रगती झालेली नाही. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय करतात ते पाहिले पाहिजे. ‘प्रजा तथा राजा’ ही म्हण पाहता अशी परिस्थिती बदलायची असेल तर पक्ष बघू नका तर योग्य कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्या, असे आवाहन घाणेकर यांनी केले.

हेही वाचा –

जुन्या भांडणातून एकास रिक्षाने फरफटत नेत लाकडी दांडक्याने मारहाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -