घरठाणेगणेशोत्सवाचे नियम शिथिल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा जिल्हा समितीचा इशारा

गणेशोत्सवाचे नियम शिथिल न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा जिल्हा समितीचा इशारा

Subscribe

नियमात शिथिलता द्यावी असे ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले आहे. तसेच नौपाडा पोलिस स्थानकात पालिका मुख्यालयासमोर महाआरती करण्यासाठी समितीच्या वतीने निवेदन देखील पोलिसांना दिले आहे.

राज्य सरकाने गणेशोत्सव नियमावली जाहीर केल्या नंतर ,प्रशासन व गणपती उत्सव मंडळ हे आमने सामने आले आहेत. बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीच्या निर्बंधांवरून मंडळांमध्ये नाराजगी पाहायला मिळत आहे. तर प्रशासना मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे प्रशासन व गणपती मंडळ यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. ठाण्यात जवळपास अडीचशेहुन जास्त गणपती मंडळ आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असं झालं नाही तर मुख्यमंत्र्यांन पर्यंत भावना पोहचवण्यासाठी येत्या मंगळवारी ठाणे महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेदडणार असल्याचा इशारा समितीने दिला आहे. तसेच  यात मूर्तीची उंची , देखावा, धार्मिक कार्यक्रम, आगमन व विसर्जन मिरवणूक यासारख्या मुद्यांबाबत सूचना मांडण्यात आल्या. परंतु, राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, या नियमात शिथिलता द्यावी असे ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने सांगितले आहे. तसेच नौपाडा पोलिस स्थानकात पालिका मुख्यालयासमोर महाआरती करण्यासाठी समितीच्या वतीने निवेदन देखील पोलिसांना दिले आहे.

- Advertisement -

एकीकडे करोनाचे संकट  आहे त्यातच कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. अश्या परिस्थितीत आता  गणपती बाप्पाच्या उत्सवावरून हा नवीन वाद सुरु झाला आहे. आता प्रशासन यावर काय तोडगा काढेल ?  गणपती उत्सव मंडळ आपली भूमिका बदलणार का ? प्रशासन नमणार का ? या सर्व प्रश्नाच्या उत्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गणपती उत्सव मंडळाच्या भावना आम्ही समजू शकतो. परंतु करोना आहे आणि सध्याच्या काळात गर्दी होऊ नये याकडे  प्रशासन पाहत आहे.  त्यामुळे सरकारची जी नियमावली आहे तीच  लागू असणार आहे. आम्ही ती बदलू शकत नाही.  करोनाचे  संकट आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.  याकडे ही पाहणे तेवढेच गरजेचे आहे.

- Advertisement -

– नरेश म्हस्के महापौर ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -