घरठाणेपाणी जपून वापरा; ठाणे जिल्ह्यात या ठिकाणी बुधवारी पाणीपुरवठा बंद

पाणी जपून वापरा; ठाणे जिल्ह्यात या ठिकाणी बुधवारी पाणीपुरवठा बंद

Subscribe

ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने येत्या बुधवारी १० मे रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत दिवा- मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या कल्याण फाटा ते शंकर मंदिर या परिसरातील पाणी पुरवठा तब्बल १२ तासांसाठी बंद राहणार आहे.

या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, तसेच पाणी कपातीच्या या काळात काटकसरीने पाणी वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

- Advertisement -

दुरुस्तीच्या काळात निर्मल नगरी, रामेश्वर पार्क, दोस्ती संकुल परिसर, भोलेनाथ नगर, रोझ नगर, एम एम व्हॅली परिसर, कादर पॅलेस ते किस्मत कॉलनी, चांद नगर परिसर, खडी मशीन रोड, शिवाजी नगर परिसर आदी भागातील पाणी पुरवठा बंद राहील.

गेल्या आठवड्यात ठाणे शहरात काही भागात पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला होता. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उथळसर प्रभाग समिती अंतर्गत जेल जलकुंभाची इनलेट जलवाहिनी ही के-व्हीला नाला येथील पूल प्रकल्पाच्या कामात ५०० मिमी व्यासाची इनलेट जलवाहिनी बाधित होत होती. त्या बाधित होणाऱ्या जलवाहिनी स्थलांतरीत करण्याच्या कामाला ६ मे रोजी झाली. त्यामुळे त्या इनलेट जलवाहिनीचे क्रॉस कनेक्शन करण्याच्या काम हाती घेतल्याने सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत असा १२ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.  या शटडाऊन कालावधीत उथळसर प्रभाग समितीमधील जेल जलकुंभ अंतर्गत श्रीरंग सोसायटी परिसर, राबोडी १, राबोडी २, पंचगंगा, आकाशगंगा, के-व्हीला परिसर, पोलीस लाईन, टेंभीनाका, सिव्हील हॉस्पिटल, ठाणे जेल, आरटीओ परिसर, कॅसल मिल, धोबी आळी व उथळसर परिसर इत्यादी भागांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -