Eco friendly bappa Competition
घर ठाणे भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत चोरट्यांची दिवाळी; चोरट्याने कापले नेत्यांसह कार्यकर्त्यांचे खिसे

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत चोरट्यांची दिवाळी; चोरट्याने कापले नेत्यांसह कार्यकर्त्यांचे खिसे

Subscribe

यात्रेच्या कार्यक्रमासाठी झालेल्या गर्दीचा फायदा उठवत यावेळी खिसेकापूंनी अनेकांचे खिसे कापले तसंच मोबाईलही लंपास केले. यातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबरच नेते मंडळीही सुटली नसल्याचे समोर आले आहे.

केंदीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमात भाजपचे नेत्यांसह कार्यकर्त्यांचे खिसे कापले गेल्याची घटना घडली आहे. दिवसभर केंद्रीय मंत्रांच्या जन आशीर्वाद यात्रा झाल्यानंतर शुभारंभाच्या कार्यक्रमात अनेकांना खिसेकापू व पाकिटमारांचा चांगलाच झटका बसला आहे. यामध्ये ठाण्याच्या एका माजी आमदारांचा खिसाच चोरट्याने कापला असून खिशातील दोन महागडे मोबाईल लंपास झाल्याचे उघडकीस आहे असून अनेक कार्यकर्त्यांचे पैसे देखील चोरट्याने लांबवले असल्याची घटना घडली आहे.

जिल्ह्याचे भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय पंचायत राज्यमंत्री पदी वर्णी लागल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार जनतेचे आशीर्वाद घ्या आणि कामाला सुरवात करा असे आदेश दिल्यानंतर पक्षाने कपिल पाटील यांची संपूर्ण जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा आयोजित केली, सोमवारी या यात्रेचा शुभारंभ ठाण्यात झाला होता. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती. या कार्यक्रमात खिसेकापूंनी उपस्थितांच्या खिशावर चांगलाच डल्ला मारला. या यात्रेच्या कार्यक्रमासाठी झालेल्या गर्दीचा फायदा उठवत यावेळी खिसेकापूंनी अनेकांचे खिसे कापले तसंच मोबाईलही लंपास केले. यातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबरच नेते मंडळीही सुटली नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

एका मोठ्या नेत्याचे दोन मोबाईल गायब झाले तर मंत्र्यांच्या जवळच्या एका व्यक्तीच्या मोठ्या रक्कमेवरही चोरट्यांनी हात मारला. एका पत्रकारालाही खिसेकापूंचा झटका बसला. मुलीच्या शिकवणीसाठीचे शुल्क भरण्यासाठी असलेले १५ हजार रूपये पाकिटमारांनी लंपास केले. या कार्यक्रमात चोरट्यांनी आपला हिसका दाखवला असला तरी फारशी तक्रार कोणी नोंदवली नाही. मात्र एका पत्रकाराने पोलीसांकडे तक्रार नोंदवली असल्यामुळे हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे पोलिस चोरट्यांचा शोध घेत असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

 

- Advertisement -

हे ही वाचा- स्‍टॉलधारकांमुळे मूर्तीकारांसमोर ‘विघ्‍न’ ; व्‍यावसायिकांकडील मूर्ती विक्रीविना पडून

- Advertisment -