HomeठाणेDombiwali : एमआयडीसी रहिवाशांना ७ तास महानगर गॅस पुरवठा बंद

Dombiwali : एमआयडीसी रहिवाशांना ७ तास महानगर गॅस पुरवठा बंद

Subscribe

डोंबिवली । एमआयडीसी परिसरातील रहिवाशांना बुधवार, ८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत महानगर गॅस पुरवठा बंद राहणार आहे. अशी सूचना देण्यात आली आहे. महानगर गॅस कंपनीकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून यासाठी पुरवठा खंडित होणार आहे.

दोन महिन्यांपूर्वीही गॅस पुरवठा काही तास बंद ठेवण्यात आला होता. मात्र, यावेळी सात तास पुरवठा खंडित राहणार असल्याने नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. महानगर गॅस सेवा सुरू होऊन सात-आठ वर्षे झाली आहेत, परंतु इतक्या मोठ्या कालावधीसाठी गॅस बंद ठेवण्याचा प्रकार दुर्मिळ आहे. एमआयडीसी परिसरातील रहिवाशांनी गॅस सिलिंडर परत करत महानगर गॅसचे नोजल शेगड्यांमध्ये बसवले आहेत. त्यामुळे तात्पुरता गॅस सिलिंडर वापरण्याचा पर्यायही उपलब्ध नाही. परिणामी, नागरिकांना हॉटेलमधून किंवा पोळी-भाजी केंद्रांतून अन्न खरेदी करावे लागते. काही जण इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करत असले तरी विद्युत पुरवठा बंद असल्यास या शेगड्याही उपयोगाच्या ठरत नाहीत. डोंबिवलीतील पाणी, वीज, आणि गॅस पुरवठा अधूनमधून खंडित होण्याचा त्रास कायम आहे. दुसरीकडे मुंबई आणि ठाणे परिसरात अशा समस्या फारशा जाणवत नाहीत. डोंबिवलीकरांना अशा गैरसोयींमधून मुक्ती कधी मिळणार, हा सवाल अजूनही अनुत्तरित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -