HomeठाणेDombiwali : एचएमपीव्ही विषाणूपासून वाचण्यासाठी अशी काळजी घ्यावी

Dombiwali : एचएमपीव्ही विषाणूपासून वाचण्यासाठी अशी काळजी घ्यावी

Subscribe

केडीएमसीचे आवाहन

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या  वैद्यकीय आरोग्य विभागाने नागरिकांना मानव मेटान्युमोव्हायरस एचएमपीव्ही विषाणूपासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. चीनमध्ये आढळलेला हा विषाणू तीव्र श्वसन संसर्गाचे मुख्य कारण असून, लहान मुले, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींना संसर्गाचा जास्त धोका आहे. एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू असून, तो प्रामुख्याने हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात उद्भवतो. हा विषाणू संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने लवकर पसरतो. संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा आहे. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी महापालिकेने काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. महापालिकेने नागरिकांना नाहक घाबरू नका, असे सांगत कोणत्याही लक्षणांची जाणीव होताच जवळच्या रुग्णालयाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. या विषाणूबाबत जनजागृती मोहिमेद्वारे नागरिकांना माहिती दिली जात आहे.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी स्पष्ट केले की, संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय महत्त्वाचे आहेत. तसेच, या आजारावर उपचारांसाठी आवश्यक औषधे उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. एचएमपीव्ही विषाणूपासून बचावासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने सूचना व उपायांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे.

हे करा:
खोकताना किंवा शिंकताना तोंड व नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण व पाण्याने किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझरने वारंवार हात धुवा.
ताप, खोकला किंवा शिंका असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
पुरेसे पाणी प्या व पोषक आहार घ्या.
घरी किंवा कार्यालयात योग्य वायुविजन सुनिश्चित करा.

- Advertisement -

हे करू नका:
हस्तांदोलन टाळा.
टिश्यू किंवा रुमालाचा पुन्हा वापर करू नका.
आजारी व्यक्तींच्या जवळ जाणे टाळा.
डोळे, नाक व तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -