HomeठाणेDombiwali : २ जानेवारीला कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा बंद

Dombiwali : २ जानेवारीला कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा बंद

Subscribe

नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन

डोंबिवली । कल्याण, डोंबिवली, टिटवाळा आणि लगतच्या ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणार्‍या उल्हास नदीकाठच्या जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये दुरुस्ती आणि देखभाल काम महापालिकेने हाती घेतले आहे. या कामांसाठी २ जानेवारी, गुरुवारी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे.
महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशानुसार बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रांमधील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची देखभाल तसेच गळती असलेल्या पाणीपुरवठा जलवाहिन्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. यामुळे पाणीपुरवठ्यात होणार्‍या तांत्रिक अडचणी दूर होतील.

पाणीपुरवठा बंदमुळे कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, डोंबिवली पश्चिम, टिटवाळा, मांडा, वडवली, आंबिवली, शहाड, आणि अटाळी या भागांवर परिणाम होणार आहे. याशिवाय, दुसर्‍या दिवशी म्हणजेच ३ जानेवारीला कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना घरगुती वापरासाठी पुरेसा पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पाणीपुरवठ्याशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी नागरिकांनी संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचे सूचित करण्यात आले आहे.