घरठाणेठाणे रोटरी क्लबकडून एनजीएफला दिव्यांगांच्या कार्यासाठी व्हीलचेअरचे दान

ठाणे रोटरी क्लबकडून एनजीएफला दिव्यांगांच्या कार्यासाठी व्हीलचेअरचे दान

Subscribe

संस्कृती सामाजिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे तर्फे नूतन गुळगुळे फाउंडेशन या सेवाभावी संस्थेला. दहा व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या स्वानंद सेवासदन सेंटरला दिव्यांच्या सोयी सुविधेकरता अनेक उपयोगी वस्तूंचे निरनिराळ्या उद्योग व सामाजिक संस्थांकडून डोनेट साहित्य (उपयोगी वस्तू) दिले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून संस्कृती सामाजिक संस्थेने रोटरी क्लबच्या माध्यमातून हे सत्पात्री दान दिले आहे. नूतन गुळगुळे फाउंडेशनचे ब्रँड अँबेसिडर, दिव्यांग मित्र, साहित्यिक, पत्रकार अँड. रुपेश पवार यांच्या पुढाकाराने हे व्हीलचेअरचे सत्पात्री दान NGF स्वानंद सेवासदन सेंटरला मिळाले आहे.

नूतन गुळगुळे फाऊंडेशनच्या स्वानंद सेवासदन सेंटरच्या माध्यमातून. कोविड काळात एक पालक गमावलेल्या बाल वयातील दिव्यांग मुलांकरता वस्तीगृहाची सोय करण्यात आली आहे. त्यांच्या सेंटरच्या भव्य इमारतीचे बांधकाम विरार या ठिकाणी सुरू आहे. यामध्ये दिव्यांगांच्या विकासासाठी शिक्षण संस्था, रोजगार प्रशिक्षण अशा सर्व योजना दिव्यांगांसाठी राबवल्या जाणार आहेत. ठाण्यातील NGF सदस्य म्हणून ब्रँड अँबेसिडर अँड. रुपेश पवार यांनी हे दहा व्हीलचेअरचे दान स्वीकारले. यावेळी रोटरी क्लब ऑफ ठाण्याचे सर्व पदाधिकारी आणि संस्कृती सामाजिक संस्थेचे संस्थापक विकास घांग्रेकर, अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या प्रचार प्रमुख सौ अश्विनी पटवर्धन रुपेश यांचे वडील चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त बी. के पवार हे मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी रुपेश पवार यांनी नूतन गुळगुळे फाउंडेशन या सेवाभावी संस्थेबद्दल उपस्थितांना माहिती दिली. एक साहित्यिक, पत्रकार, समाजसेवक म्हणून मी कायम नूतन गुळगुळे फाउंडेशनला सहकार्य देत असतो असे पवार यांनी सांगितले. यावेळी विकास घांग्रेकर यांनी संस्कृती सामाजिक संस्थेला रोटरी क्लबने सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यावेळी रोटरी क्लबने घंटाळी देवी मंदिर न्यासला रुग्ण उपयोगी साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदतीचे सत्पात्री दान दिले. या मिळालेल्या दानचा आम्ही चांगला उपयोग करू अशी ग्वावी घांग्रेकर यांनी दिली. यानंतर रुपेश पवार यांनी मान्यवरांना स्वलिखित पुस्तक भेट दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -