घर ठाणे मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मुक्याजीवांची घेतली जातेय काळजी

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मुक्याजीवांची घेतली जातेय काळजी

Subscribe

आपत्ती कोणावर कधी येईल हे सांगता येत नाही, मग तो मनुष्यप्राणी असो या मुकाजीव असो. अशाच ३२६ मुक्या जीवांवर या वर्षातील २३० दिवसात संकटाचे काळे ढग आले होते. त्या ढगांना वेळीच बाजूला सारून मुक्याजीवांच्या मदतीला ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग धावली. येवढेच नाहीतर कोणताही भेदभाव न करता त्यांना जीवदान ही देत, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मुक्याजीवांची काळजी घेतली जाते हे दाखवून दिले. आतापर्यंत १९३ प्राण्यांना तर १३३ पक्ष्यांना हे जीवदान मिळाले आहे. विशेषतः पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जीवदान देत मोलाचे कार्य करत माणुसकी जपण्याचा या विभागाने प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षामधील दूरध्वनी क्रमांक हा पावसाळा असो या नसो वर्षाच्या बारा महिने तो वारंवार खणखणत असतो. अहो साहेब… येथे झाड पडले किंवा अपघात झाला आहे. अन्यथा साहेब उंच झाडाला किंवा विजेच्या खांब्याला कावळा,कबुतर अडकले आहे. तसेच नाल्यात कुत्रा अडकून पडला आहे. असे फोन दररोज चालूच असतात. कुत्री- मांजरी, गुरे किंवा कावळा- कबुतर यांच्या येणाऱ्या तक्रारींची अन्य तक्रारींमध्ये नोंद केली जाते. अशाप्रकारे १ जानेवारी पासून १९ ऑगस्टपर्यंत तब्बल ३२६ तक्रारी आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये नोंदवल्या गेल्या आहेत. यामध्ये १९३ तक्रारींमध्ये प्राणी आणि १३३ तक्रारींमध्ये पक्ष्यांसंदर्भात आहेत. पहिल्या पाच महिन्यात एकूण तक्रारींपैकी २२८ तक्रारींचा समावेश आहे.       मानवी जीवाप्रमाणे मुकाजीव ही तितकाच महत्वाचा आहे. या कक्षात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची येथे नोंद केली जाते. तसेच प्रत्येक तक्रारीनुसार त्याबाबत घटनास्थळी जाऊन खातजमा केली जाते. तसेच मुक्याजीवांना वेळप्रसंगीच रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले जाते. हे आमचे काम आहे ते आम्ही करतोय, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

- Advertisement -

पाण्याच्या प्रवाहात वाहणाऱ्या म्हशी जीवदान
ठाणे शहरात गुरुवारी २७ जुलै रोजी दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत म्हणजे सात तासात १३७.१२ मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे ठीक ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याबरोबर नाल्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाहत होता. अशाप्रकारे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोड, आनंद नगर, येथील मुच्छला कॉलेज जवळील नाल्यामध्ये एक म्हैस पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत येऊन नाल्यात अडकली आहे.ती सुखरूप बाहेर काढत तिला जीवदान दिले.

वाघाच्या मावशी सुटका
खेळता खेळता झाडावर चढल्यानंतर त्याच झाडावर १८ ऑगस्ट रोजी सकाळीच वाघाची मावशी अडकल्याचा फोन आला. तातडीने ती त्या उंच झाडावरून सुखरूप सुटका करत तिला वाचविण्यात यश आले.

- Advertisement -

या वर्षातील मुक्याजीवांच्या तक्रारींचा तक्ता
महिने               प्राणी      पक्षी
जानेवारी            २६        ३५
फेब्रुवारी            २२        १४
मार्च                ३०        १७
एप्रिल              ३०        १७
मे                  २२        १५
जून                २०        १६
जुलै                २८        १३
१९ ऑगस्टपर्यंत   १५        ०६
एकूण              १९३     १३३

- Advertisment -