घरठाणेकसाऱ्यात कोरोना काळात नागरिक वाऱ्यावर; आमदार दौलत दरोडांची आरोग्य केंद्राला भेट

कसाऱ्यात कोरोना काळात नागरिक वाऱ्यावर; आमदार दौलत दरोडांची आरोग्य केंद्राला भेट

Subscribe

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला का ? वरिष्ठ अधिकारी इथल्या रुग्णांचा विचार करणार कधी ?

खर्डी शहापूर तालुक्यातील कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रास शहापुर तालुक्याचे आमदार दौलत दरोडा यांनी भेट दिली असता मुख्य वैद्यकीय अधिकारी मुख्यालय सोडून १६ एप्रिल पासून कर्तव्यावर नसल्याचे निदर्शनास आले आहे . नेमके गैरहजर की रजेवर याचा बोध होऊ शकला नाही . वाढत्या कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्याकरता राज्य शासनाकडून आरोग्य यंत्रणेला ‘ अलर्ट ‘ राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत . मात्र शहापुर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या बळामुळे हतबल झाल्याचे वास्तव निर्माण झाले आहे . प्राथमिक आरोग्य केंद्राची खरी स्थिती कोरोना काळात आमदार दरोडांच्या भेटीत दिसून आल्याने आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे .

कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या आणि मृत्युदर यामुळे कसारा आणि आसपासच्या परिसरातील चिंता वाढली आहे.मात्र नेमकी ज्यांच्यावर कोरोना नियंत्रणाची मुख्य जबाबदारी आहे . असे मुख्य वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर नसल्याने डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे . त्यामुळे कोविड -१ ९ प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवायचे कुणी आणि कसे ? असा सवाल उपस्थित होत आहे.एकीकडे लसीकरण मोहिमेची दवंडी पिटायची , दुसरीकडे कोरोना विषाणूला आटोक्यात आणायचे आणि तिसरीकडे नियमित बाह्यरुग्ण कक्ष चालवायचे हे इतर नवीन दिसणारे वैद्यकीय अधिकारी पेलवू शकतात का , हा देखील चिंतेचा विषय आहे.

- Advertisement -

ज्यांच्यावर कोरोना महामारीत कसारा प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे . असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला का ? आई वडिलांची तब्येत ठीक नसल्याचे सांगून ते रजेवर गेले आहेत असे सांगणारे वरिष्ठ अधिकारी इथल्या रुग्णांचा विचार करणार कधी ? कोरोना महाभयंकर काळात मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला का ? असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.उपकेंद्र आणि पथकातल्या डॉक्टरांना आरोग्य केंद्रात कर्तव्यावर नेहमीच धाडले जात असल्याने अजनुप , वाशाळा आदी भागात सौम्य आजारांच्या रुग्णांवर लक्ष देण्यास डॉक्टर अपुरे पडत आहे.शिवाय कोरोना बाधित रुग्ण येऊन गेल्याचे कारण कारण पुढे करून दोन दिवस बाह्य रुग्ण कक्ष बंद ठेवण्यात आले होते.असा तक्रारींचा पाढा उपस्थित नागरिकांनी वाचला असता आमदार दरोडा यांनी चौकशी करणार असल्याचे आश्वासित केले .

मुख्य वैद्यकीय अधिकारी हे आईवडिलांच्या तब्येतीमुळे रजेवर आहेत.मात्र त्यांच्या ठिकाणी पथकाच्या डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे . तरी याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांना सूचना देण्यात येतील . -मनीष रेंगे , जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद , ठाणे

- Advertisement -

कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी , आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित असायला हवे.याबाबत आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील . -दौलत दरोडा , आमदार विधानसभा , शहापूर

गेले दोन दिवस बाह्य रुग्ण कक्ष बंद ठेऊन आरोग्य केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते.दवाखाण्याबाहेर ओपीडी बंद आणि कर्मचाऱ्यांशी कुणी हुजत घातल्यास कारवाई करण्यात येईल , असे फलकावर ठळक अक्षरात लिहिले जाते . मग जनतेने समस्या मांडायची कशी , तसेच इथले मुख्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याचे अनेकदा अनुभवायला मिळाले आहे . एखादा आरोग्य विषयक दाखला घ्यायचा असल्यास इतर डॉक्टरांना विचारल्यास आम्हाला अधिकार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते . -विक्रम हिवरे , उपाध्यक्ष – वंचित बहुजन विकास आघाडी , कसारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -