घरठाणेकारवाईदरम्यान भूमाफियाची महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी बाचाबाची, धक्काबुक्की

कारवाईदरम्यान भूमाफियाची महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी बाचाबाची, धक्काबुक्की

Subscribe

ठाण्यातील मुंब्रा, डावले गाव याठिकाणी  भूमाफियांनी शासकीय भूखंडावर अतिक्रमण करुन दोन ते तीन मजली इमारत उभारुन त्यात अतिक्रमण केले होते, बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांचे अंतर्गत ठाणे तहसीलदार विभाग व ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागा यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यास सुरु झाली. त्या इमारतीला पाडल्यानतंर भूमाफियांनी घोळका करुन नायब तहसिलदार दिनेश पैठणकर व शीळ तलाठी रोहन वैष्णव या अधिकाऱ्यांशी बाचाबाची करत धक्काबुक्की केली. तर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानतंर भूमाफियांनी तेथून पळ काढला. याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात तीन भूमाफिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

डावले गाव मधील त्या नागरिकांना एक महिन्याची मुदत दिली आहे, त्यानंतर ही कारवाई पुर्ण करणार असल्याचे नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले. याकारवाई वेळी मंडळ अधिकारी रविंद्र काळे,तलाठी रोहन वैष्णव,तलाठी विश्वनाथ राठोड,तलाठी जीवन कोरे,तलाठी प्रीती घुडे,तलाठी राहुल भाटकर,तलाठी राहुल भोईर आणि ठाणे महापालिका अतिक्रमण विभाचे अधिकारी आदीजण उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -