प्रताप सरनाईकांना धक्का; त्यांच्याशी संबंधित बिल्डर योगेश देशमुख इडीच्या ताब्यात

shiv sena mla pratap sarnaiks aide builder yogesh deshmukh granted bail
प्रताप सरनाईकांशी संबंधित व्यावसायिक योगेश देशमुख यांना जामीन

कल्याण मधील एक प्रथितयश बिल्डर योगेश देशमुख यांना रात्री उशिरा ईडी ने अटक केली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी योगेश देशमुख यांचे आर्थिक संबंध होते. तसेच टिटवाळा नजीक गुरवली येथील 78 एकर जागा देखील प्रताप सरनाईक यांनी देशमुख यांच्याकडून खरेदी केल्याचे पुरावे इडीला चौकशीत मिळाल्याचे सांगण्यात येते. 16 मार्च रोजीच योगेश देशमुख यांच्या कल्याण गोदरेज हिल येथील बंगल्यावर ईडीच्या पथकाने रेड केली होती. त्यावेळी योगेश देशमुख हे घरात होते मात्र या कारवाईने ते अस्वस्थ झाले आणि नंतर त्यांना कोविडचे निदान झाले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते.

या रेडच्या वेळी योगेश देशमुख यांची पत्नी शीतल यांचा ईडीच्या अधिकाऱ्यांशी वादही झाला होता. आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी गुरवली जागेबाबत झालेला व्यवहार हा पूर्ण झालेलाच नसल्याचा दावा त्यावेळी शितल यांनी केला होता.