घरठाणेअनिल जयसिंगानीच्या घरावर ईडीची धाड !

अनिल जयसिंगानीच्या घरावर ईडीची धाड !

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणा-या अनिल जयसिंगानी याच्या उल्हासनगरच्या घरात  प्रवर्तन निदेशालया (ईडी ) ने धाडी टाकल्या. या धाडीत काही महत्वाची कागदपत्रे मिळाले असल्याचे सूत्रांकडून समजते. मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास गुजरात ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी  पोलीस पथकासह उल्हासनगरात अनिल जयसिंगानी याच्या मायापुरी अपार्टमेंटमधील सातव्या मजल्यावर धाड मारून घरात झाडा झडती सुरु केली.  या धाडीत अनिल जयसिंगानी याचे कोण कोणते क्रिकेट बुकींशी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी आर्थिक संबंध आहेत. त्याची चौकशी ईडी मार्फत करण्यात येत आहे.

क्रिकेट बुकी म्हणून तसेच गुन्हेगारी क्षेत्रात कुविख्यात असलेला अनिल जयसिंगानी याच्या विरोधात उल्हासनगर, मुंबई, गुजरात,गोवा,आसाम, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेशात अशा विविध राज्यातील पोलीस ठाण्यात जवळपास  17 गुन्हे  दाखल आहेत. तसेच अनिल जयसिंगानी याची मुलगी अनिक्षा जयसिंगानी हिने थेट अमृता फडवणीस यांच्या सोबत ओळख  करून त्यांच्या घरात बिनधास्त पणे वावर सुरु केला होता. अनिक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या घरात ये-जा करीत होती. परंतु तिच्या गोड स्वभावामुळे कुणालाच तिच्यावर  संशय आला नाही.

- Advertisement -

या दरम्यान तिने आपल्या वडिलांवर दाखल असलेले गुन्हे काढून टाकण्यासाठी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केला. तसेच या कामी मदत केली नाही, तर मीडियामध्ये बदनाम करू या प्रकारे ब्लॅकमेल करू लागल्याने अमृता फडणवीस यांनी थेट पोलीसात तक्रार केली.  या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी  उल्हासनगर येथील मायापुरी अपार्टमेंटमधून अनिक्षाला  अटक केली.  या शिवाय अनेक गुन्ह्यात फरार असलेला अनिल जयसिंगानी याला देखील  गुजरात मधून अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर गुजरात पोलिसांनी अनिलला ताब्यात घेतले. त्याचे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी आर्थिक सबंध असल्याचा संशय आल्यानंतर गुजरात ईडी कार्यालयाने या प्रकरणी चौकशी सुरु केली.  त्यानुसंगाने मंगळवारी ईडीने उल्हासनगर मधील त्याच्या घरावर धाड मारून कागदपत्रांची शोध मोहिम सुरु केली आहे. या धाडीत काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली असल्याचे सूत्रांकडून समजते. या बाबत ईडीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी चौकशी सुरु आहे, मात्र या बाबत कोणती अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -