घरठाणेठाण्यात आठ कन्टेन्मेंट झोन; लॉकडाऊनचे नियम कडक

ठाण्यात आठ कन्टेन्मेंट झोन; लॉकडाऊनचे नियम कडक

Subscribe

एकीकडे मंगळवारपासून कोरोना बाबतीतील नियम शिथिल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. परंतु, दुसरीकडे ज्या भागात आजही कोरोना रुग्ण वाढत आहेत. अशा ८ ठिकाणी लॉकडाऊनचे नियम कडक असतील असेही ठाणे महापालिकेने जाहीर केले आहे. या ठिकाणी पुढील १५ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये लोकमान्य नगर – सावरकरनगर प्रभाग समितीमधील काही भाग, कळवा आणि उथळसर आणि वागळेतील काही भागांचा समावेश किंवा इमारतींचा समावेश असून त्याच ठिकाणी कडक निर्बंध लागू राहणार आहेत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

मागील काही दिवसांपासून ठामपा कार्यक्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या १ लाख २८ हजार ८६९ कोरोना रुग्णांपैकी १ लाख २५ हजार ३६० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, १ हजार ९१५ रुग्णांचा या आजारामुळे मृत्यू झाला असून सद्यास्थितीत शहरात अवघे १ हजार ५९४ सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisement -

दुसर्‍या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिका प्रशासनाने शहरातील १२७ मायक्रो कन्टन्मेंट झोन म्हणून जाहीर केले होते. या इमारती तसेच परिसरातील नागरिकांमुळे शहराच्या दुसर्‍या भागांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ही उपाययोजना केली जात होती. त्यानुसार शहरात सद्यस्थितीत अवघे ८ कन्टेन्मेंट झोन शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये ३ ठिकाणी, कळवा दोन ठिकाणी, उथळसर दोन आणि वागळेतील एका ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -